केरळमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा एक रुग्ण आढळला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. ‘JN1’ या नवीन कोरोनाव्हायरसचे रुग्ण चीन आणि अमेरिकेत आढळून येत आहेत. भारतातील केरळमध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळला आहे. इंडियन सार्स कोरोना जीनोमिक करसोटियम अंतर्गत सुरू असलेल्या कोरोना चाचणीदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली. 

८ डिसेंबर रोजी केरळमधील काराकुलम, तिरुवनंतपुरम येथे एका वृद्ध महिलेला ‘JN1’ ची लागण झाल्याचे आढळून आले. 18 नोव्हेंबर रोजी महिलेची कोरोनाव्हायरस (RT PCR) चाचणी करण्यात आली. तिला सौम्य लक्षणे होती. तिलाही जरा अशक्तपणा जाणवत होता. मात्र आता तिची तब्येत चांगली असल्याचे वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले.

‘JN1’ हा ‘BA.2.86’ गटातील कोरोना विषाणूचा उपप्रकार आहे. ज्या भागात नवीन कोरोना रुग्ण आढळला त्या भागातील परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लक्ष ठेवले जात आहे आणि राज्य सरकार परिस्थितीचा आढावा घेत आहे.

तसेच कोरोनाच्या या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मॉक ड्रील घेण्यात येत आहेत. केरळमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यापैकी बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे असतात आणि ते घरीच बरे होतात.

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी डिसेंबरच्या सुरुवातीला अमेरिका, चीन आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध देशांमध्ये कोरोनाच्या उपप्रकारामुळे बाधित रुग्ण कमी-अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.

‘काळजी करण्याचे कारण नाही’

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी स्पष्ट केले की केरळमध्ये आढळलेल्या ‘कोविड-19’ विषाणूचा ‘JN.1’ उपप्रकार चिंताजनक नाही. काही महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर तपासणी करण्यात आलेल्या भारतीय प्रवाशांमध्ये हा उपप्रकार आढळून आला होता. मात्र, याबाबत घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कारण नाही, असे जॉर्ज म्हणाले.


हेही वाचा

मुंबईत ‘नव्या’ गालगुंडची साथ, बहिरे होण्याचाही धोका

डेंग्यू रुग्णसंख्येत महाराष्ट्र देशात दुसरे, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

[ad_2]

Related posts