Ipl Auction 2024 Riley Rossow Steve Smith Daryl Mitchell Chris Woakes Ish Sodhi May Unsold Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Big Name Who May Go Unsold In IPL Auction 2024 : आज होणाऱ्या आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडू शकतो. 333 खेळाडूंचा लिलाव (IPL Auction) 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दहा संघ 77 खेळाडू खरेदी करतील. आज अनेक खेळाडू मालामाल होतील, तर काहींच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असेल. या खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी शानदार राहिली आहे. तरीही लिलावात या खेळाडूंना खरेदीदार मिळण्याची शक्यताच नाही. पाहूयात यंदाच्या लिलावात अनसोल्ड (Unsold) राहू शकणारे पाच दिग्ज खेळाडू….

रिले रुसो

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज रिले रुसोचा याचा आंतरष्ट्रीय रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. रुसोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने टी 20 मध्येही खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. रुसोने 20 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 159.79 च्या स्ट्राइक रेटने आणि 34.86 च्या सरासरीने 767 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 14 आयपीएल सामन्यांमध्ये 136.46 च्या स्ट्राइक रेट आणि 21.83 च्या सरासरीने 262 धावा केल्या आहेत. जबरदस्त आकडे असतानाही रुसो लिलावात अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.

स्टीव स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ अनेक वर्षांपासून आयपीएल संघाचा भाग आहे. स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, आरसीबी, पुणे सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांसाठी खेळला आहे. राजस्थानसाठी स्मिथने कर्णधारपदाची धुराही संभाळली आहे. पण यावेळी त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमीच आहे. स्टीव्ह स्मिथने 103 आयपीएल सामन्यांमध्ये 128.1 च्या स्ट्राइक रेटने आणि 34.5 च्या सरासरीने 2485 धावा केल्या आहेत. मात्र, स्टीव्ह स्मिथचा अलीकडचा फॉर्म अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. खासकरुन टी-२० फॉरमॅटमध्ये. या कारणामुळे स्टीव्ह स्मिथला आयपीएल लिलावात निराशेचा सामना करावा लागू शकतो.

डॅरेल मिचेल

डॅरेल मिचेल याने विश्वचषकात भारतीय गोलंदाजांची कुटाई केली. त्याने भारताविरोधात दोन शतकेही ठोकली आहे. त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्डही जबराट आहे. सध्याचा फॉर्मही खतरनाक असतानाही तो आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे. डॅरेल मिशेल  झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो, याशिवाय डॅरेल मिशेल गोलंदाजी करू शकतो. डॅरेल मिशेल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. पण यावेळी डॅरेल मिशेल मिनी लिलावात अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.

ख्रिस वोक्स

अष्टपैलू ख्रिस वोक्स याच्यावर अनसोल्ड राहण्याची वेळ येऊ शकते. ख्रिस वोक्स  गोलंदाजीशिवाय स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पॉवरप्ले ओव्हरमध्ये ख्रिस वोक्सने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. तो तळाला चांगली फलंदाजी करू शकतो. मोठे फटके मारण्याची क्षमताही त्याच्यात आहे. ख्रिस वोक्सने आयपीएलचे 21 सामने खेळले आहेत. पण यावेळी जर संघांनी लिलावात बोली लावली नाही तर ख्रिस वोक्स अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.

ईश सोढी

फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर न्यूझीलंडचा इश सोढी घातक ठरू शकतो. न्यूझीलंडसाठी टी-20 फॉरमॅटमध्ये त्याची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. याशिवाय ईश सोढीने आयपीएलचे 8 सामने खेळले आहेत. IPL च्या 8 सामन्यांमध्ये ईश सोढीने 6.7 च्या इकॉनॉमी आणि 22.44 च्या सरासरीने 9 फलंदाजांना बाद केले आहे. पण यावेळी त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमीच आहे.

[ad_2]

Related posts