[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IPL Auction: अखेर तो दिवस उजाडलाय. आज आयपीएलचा लिलाव होतोय. मिनी लिलावासाठी फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. दुबाईमध्ये लिलाव पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी एक वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. 333 खेळाडू लिलावात नशीब अजमावणार आहेत. त्यापैकी 214 खेळाडू भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी (overseas players) आहेत. लिलावात अनेक स्टार खेळाडू मालामाल होतील, तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.
लिलावात नावं दिलेल्या 333 खेळाडूंपैकी दोन खेळाडू असोशिएट देशांचे आहेत. 116 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत तर 215 खेळाडू अनकॅप (uncapped players) आहेत. 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. दहा संघामध्ये फक्त 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे, त्यामध्ये 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
आयपीएल लिलाव लाईव्ह कुठे पाहाल ?
दुबईत होणारा आयपीएल लिलाव चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकतात. पण हॉटस्टारवर लिलाव पाहता येणार नाही. चाहत्यांना जिओ सिनेमा अॅपवर लिलावचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकतात. त्याशिवाय जिओ सिनेमाच्या संकेतस्थळावरही लाईव्ह पाहू शकतात. भारतीय वेळेनुसार, लिलाव दुपारी एक वाजता सुरु होणार आहे.
कुठे पार पडणार लिलाव ?
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलेय.
मुंबईची मल्लिका सागर बोली लावतील –
आयपीएल 2024 मध्ये मल्लिका सागर बोली लावतील. मल्लिका सागर ही मुंबईची रहिवासी असून तिने यापूर्वीही हे काम केले आहे. मल्लिकाने याआधीही हे काम चांगले केले आहे.मल्लिकाने महिला प्रीमियर लीग 2023 म्हणजेच WPL च्या पहिल्या सत्रात सर्व खेळाडूंचा यशस्वी लिलाव केला होता. महिला प्रीमियर लीगमधील लिलावाची तिची वेगळी शैलीही लोकांना आवडली. परिणामी, मल्लिकाने महिला आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचा लिलावही केला. क्रिकेट व्यतिरिक्त मल्लिकाने प्रो कबड्डी लीग 2021 च्या लिलावात खेळाडूंवर देखील बोली लावली आहे. अशा स्थितीत मल्लिकाला याचा खूप अनुभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजपर्यंत लिलाव कोणी केले?
लिलावात बोली लागणारे महत्वाचे खेळाडू –
हॅरी ब्रूक, ट्रेविस हेड, करुण नायर, मनिष पांडे, पॉवेल, रुसो, स्टिव्ह स्मिथ, कोइटजे, पॅट कमिन्स, वानंदु हसरंगा, डॅरेल मिचेल, ओमरजाई, हर्षल पटेल, रचिन रविंद्र, शार्दूल ठाकूर, ख्रिस वोक्स, लॉकी फर्गुसन, जोश हेजलवूड, जोसेफ अल्जारी, मधुशंका, शिवम मावी, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, जयदेव उनादकट, उमेश यादव
या यादीत 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी
या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.
गुजरातकडे सर्वाधिक पैसा –
आरसीबीच्या पर्समध्ये 23.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीने 11 खेळाडू रिलिज केले तर कॅमरुन ग्रीनला ट्रेड केले. जोश हेजलवुड, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांना आरसीबीने रिलीज केले. सनराइजर्स हैदराबाद संघाकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकात्याकडे 32.7 कोटी शिल्लक आहेत. चेन्नई, पंजाब, दिल्ली आणि मुंबईच्या संघाकडे अनुक्रम 31.4 कोटी, 29.1 कोटी, 28.95 कोटी आणि 17.75 कोटी शिल्लक आहेत. त्याशिवाय राजस्थानकडे 14.5 कोटी शिल्लक आहेत.
IPL 2024/ Squad Size/Salary Cap/Available Slots
|
||||||
संघ
|
खेळाडू
|
परदेशी खेळाडू
|
किती खर्च केले? (Rs.)
|
किती शिल्लक राहिले? (Rs.)
|
किती खेळाडूंची जागा शिल्लक?
|
विदेशी खेळाडू किती हवेत?
|
चेन्नई CSK
|
19
|
5
|
68.6
|
31.4
|
6
|
3
|
दिल्ली
DC
|
16
|
4
|
71.05
|
28.95
|
9
|
4
|
गुजरात
GT
|
17
|
6
|
61.85
|
38.15
|
8
|
2
|
कोलकाता
KKR
|
13
|
4
|
67.3
|
32.7
|
12
|
4
|
लखनौ
LSG
|
19
|
6
|
86.85
|
13.15
|
6
|
2
|
मुंबई इंडियन्स
MI
|
17
|
4
|
82.25
|
17.75
|
8
|
4
|
पंजाब किंग्स
PBKS
|
17
|
6
|
70.9
|
29.1
|
8
|
2
|
आरसीबी
RCB
|
19
|
5
|
76.75
|
23.25
|
6
|
3
|
राजस्थान RR
|
17
|
5
|
85.5
|
14.5
|
8
|
3
|
हैदराबाद
SRH
|
19
|
5
|
66
|
34
|
6
|
3
|
एकूण
|
173
|
50
|
737.05
|
262.95
|
77
|
30
|
[ad_2]