Shiv Sena MLA Disqualification Hearing Update Split In The Party Is A Planned Political Conspiracy, It Cannot Happen Overnight Says Thackeray Advocate Devadatt Kamat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर :  शिवसेना (Shiv Sena)  आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification)  याचिकेवरील सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  यांच्यासमोरील ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद संपला. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Devadatt Kamat) यांनी  पक्षातली फूट हा नियोजनबद्ध राजकीय कट असल्याचा युक्तिवाद आज कोर्टात केला आहे. 20 आणि 21 जून 2022 ला जे घडलं ते एका रात्रीत होत नाही, यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं 

आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या वकिलांचा अध्यक्षांसमोर युक्तिवाद पूर्ण झाला आहे.  कामत म्हणाले,  20 आणि 21 जून 2022 ला जे घडलं ते एका रात्रीत होत नाही. यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं . ते उत्तर देताना म्हणत आहे की,  शिवाजी महाराज गेले म्हणून आम्ही सुरतला गेलो. तुम्ही तुमच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घेत आहे आणि अवमान करताय. हे सगळे आमदार एकाच वेळी निघतात आणि एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये जातात आणि विरोधीपक्षाला पाठींबा द्यायला तयार होतात ? हा सगळा राजकीय नियोजन बद्ध कट होता हे या सगळ्या घटनांकडे पहिल्यावर दिसतंय.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद जसाच्या तसा

कामत म्हणाले, राजकीय पक्ष विधीमंडळ पक्षाला ब्लॅक चेकप्रमाणे अमर्याद अधिकार देऊ शकत नाही. विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाच्या मार्गदर्शनानेच काम करत असतो. राजकीय पक्षाच्या विचारधारेनुसार विधीमंडळ पक्ष काम करत नसेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे. 2018 पर्यंत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून विरोध केला नाही किंवा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीत निवडणूक लढवली नाही.  तुम्हाला पक्षाच्या अध्यक्षांचे विचार पटत नसतील, तर लोकशाहीने निवडणूक घेऊन त्यांना हटवण्याचे अधिकार दिलेले आहेत.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी होऊ शकते? ठाकरे गटाच्या वकिलांचा सवाल

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे असा दावा प्रतिज्ञापत्रमध्ये दावा करण्यात आला आहे. 20 जून 2022 पर्यंत शिवसेना पक्ष एकच असताना त्याची घटना रचना असताना 21 आणि 22 जून ला आमदार उपस्थित राहिले नाही. ते सुरतला, गुवाहाटीला गेले. 29 जूनला राज्यपालांकडे गेले. त्यांची बैठकीला अनुपस्थिती हीच पक्षविरोधी कृती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दावा करण्यात आलाय की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी होऊ शकते? असा सवाल कामत यांनी केला.  शिंदे गटातील आमदार उत्तर देतात की आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आम्ही त्यांच्यासोबत आहोत याचा अर्थ जर एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर हे सुद्धा अपात्र ठरणार, असेही कामत म्हणाले. 

भरत गोगावले हे खोटे बोलतात : देवदत्त कामत

सद्‌सद्‌विवेक बुद्धी स्मरून मतदान करता येत नाही. पक्षाने बजावलेला व्हीपनुसारच मतदान करावे लागते. पक्षाची विचारधारा जपणे ही विधीमंडळ सदस्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम आहे. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी व्हीप कसा बजावला, याची माहिती त्यांना दाखवता आली नाही. थेट शेवटच्या साक्षीदाराने (भरत गोगावले) मोबाईल फोन दाखवत व्हीप बजावल्याचे सांगितले.हा मोबाईल क्रमांक साक्षीदारांच्या नावावरच नसल्याचे त्यांनी मान्य केले. शेवटच्या दिवशी हा कागद दाखवला जातो. प्रथमदर्शनी हे दिसून येते की नंबर हा मित्राच्या नावावर असल्याचे सांगत असताना हा बनाव असल्याचे स्पष्ट होते. महत्त्वाची बाब म्हणजे हॉटेलवरुन विधीमंडळात पोहचलेली वेळ व व्हीप बजावलेली वेळ याबाबत साक्ष देताना तफावत दिसून येते. त्यामुळे भरत गोगावले हे खोटे बोलत असल्याचे सिद्ध होते.

[ad_2]

Related posts