IPL Auction 2024 Pat Cummins Becomes Most Expensive Player IPL History 20.5 Crore Sold To Sunrisers Hyderabad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Auction 2024, Pat Cummins: पॅट कमिन्स आजवरच्या आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं 20 कोटी 50 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली आहे. दरम्यान, यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली सॅम करनवर लावण्यात आली होती. सॅम करनवर पंजाबनं 18 कोटी रुपयांची बोली लावली होती. 

आजवरचे सर्वात महागडे खेळाडू

  • सॅम करन 18.5 कोटी  (पंजाब 2023)
  • कॅमरुन ग्रीन : 17.50 कोटी (मुंबई इंडियन्स 2023)
  • बेन स्टोक्स : 16.25 कोटी (चेन्नई 2023)
  • क्रिस मॉरिस : 16.25 (राजस्थान 2021)
  • युवराज सिंह : 16 कोटी (दिल्ली 2015)
  • निकोलस पूरन : 16 कोटी (लखनौ 2023)
  • पॅट कमिन्स : 15.50 कोटी (कोलकाता 2020)
  • कायले जेमिसन : 15 कोटी (आरसीबी 2021)
  • बेन स्टोक्स : 14.5 कोटी (पुणे 2017)

यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी 

यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

लिलावात ‘या’ खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता 

हॅरी ब्रूक, ट्रेविस हेड, करुण नायर, मनिष पांडे, पॉवेल, रुसो, स्टिव्ह स्मिथ, कोइटजे, पॅट कमिन्स, वानंदु हसरंगा, डॅरेल मिचेल, ओमरजाई, हर्षल पटेल, रचिन रविंद्र, शार्दूल ठाकूर, ख्रिस वोक्स, लॉकी फर्गुसन, जोश हेजलवूड, जोसेफ अल्जारी, मधुशंका, शिवम मावी, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, जयदेव उनादकट, उमेश यादव 

कुठे पार पडणार लिलाव?

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील  कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2024 Auction: 1 कोटी बेस प्राईज, पण लिलावात साडेसात पटींनी अधिकची बोली; रोवमॅन पॉवेल राजस्थानच्या ताफ्यात

[ad_2]

Related posts