Maratha Reservation Opposition Maha Vikas Aghadi Unhappy On CM Eknath Shinde Speech In Maharashtra Assembly On Maratha Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation :  विधानसभेत मराठा आरक्षणावरील (Maratha Reservation) चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केलेल्या भाषणावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मराठा आरक्षण देता येत नसल्याने त्यांनी आता गाजर दाखवण्यास सुरुवात केली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणावर उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांचे आजचे उत्तर म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असा आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असे सांगितले होते. ओबीसींच्या समस्या होता त्यावर सुद्धा कुठेही चर्चा झाली नाही. जुन्या योजना ज्या आमच्या सरकारमध्ये होत्या त्याच पुन्हा नव्याने सांगितल्या असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. निवडणुकीपर्यंत वेळ मारून न्यायची आणि आचारसंहिता आली की मग पूर्ण विषय संपवायचा असा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. 

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले की, 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर यामध्ये सरकारकडे करायला काही नाही. फक्त आतापर्यंतचा इतिहास मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितला. मराठा आरक्षणासाठी कोर्टात जे वकील आमच्या सरकारच्या वेळी होते तेच वकील आता आहेत असे त्यांनी म्हटले. मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेऊ या संदर्भात एक कुठलेही आश्वासन आता पुन्हा दिले नाही, त्याचा उल्लेख सुद्धा नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  फेब्रुवारी पर्यंत हा निर्णय पुढे न्यायचा आणि आचारसंहिता लागल्यावर पुन्हा एकदा गाजर दाखवायचं असं काम सरकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. 

24 तारखेपर्यंत निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले. सरकारकडून आता गाजर दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.  आमच्या सरकारमध्ये हायकोर्टात वकील होते, तेच सर्वोच्च न्यायालयात होते त्यामुळे धांदात खोटे आरोप आमच्या सरकारवर केले असल्याचेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी आजची वेळ मारून नेली. त्यांच्याकडे काही ठोस निर्णय नाही हे त्यांच्या भाषणावरून कळलं असल्याची टीका त्यांनी केली. किती कुणबी सर्टिफिकेट दिला यावरही भाष्य त्यांनी केलं नाही. मुख्यमंत्र्यांचे भाषण वेळकाढूपणाचे असल्याची टीका त्यांनी केली.  मार्ग निघेल अशी आशा असताना हे मार्ग सरकार काढत नाही. सगळ्यांची दिशाभूल करायची आणि त्यातून फळ काढण्याचे काम सरकार करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी केली. 

[ad_2]

Related posts