INDIA Alliance Meeting At Delhi Discussion On Lok Sabha Election Seat Sharing And Other Important Things In Meeting

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

I.N.D.I.A. Alliance Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक (I.N.D.I.A Alliance meeting)  दिल्लीत (Delhi) पार पडली. आजच्या बैठकीत 28 घटक पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, जाहीर सभा आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष (Congress President) मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी आजच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जागा वाटपाबद्दल स्पष्टच भाष्य केले. 

राजदचे खासदार मनोज झा यांनी बैठकीत अतिशय स्पष्ट चर्चा झाली असल्याचे सांगितले. आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी 20 दिवसांत सुरू होईल. तीन आठवड्यांत सर्व निर्णय घेतले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. 

लोकसभा निवडणूक जागा वाटप कसे होणार?

बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, आज आघाडीच्या चौथ्या बैठकीत 28 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येऊन भविष्यात कसे काम करायचे हे ठरवले ही आनंदाची बाब आहे. ते म्हणाले की, सर्व पक्षांनी 8-10 जाहीर सभा घेण्याचे ठरवले. खरगे यांनी जागा वाटपाबाबत सांगितले की, आधी राज्यस्तरावर जागा वाटपाबाबत चर्चा होईल आणि काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा केली जाईल. 

आजच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती खरगे यांनी दिली. खासदारांवरील कारवाई ही लोकशाही विरोधी असून त्याविरोधात लढा द्यावा लागेल. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन सुरक्षेतील हलगर्जीपणाच्या घटनेवर निवेदन करावे अशी साधी मागणी आहे. अधिवेशन सुरू असताना त्यांनी इतर ठिकाणी भाषण करावे, असे कधीच घडले नाही.  खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात 22 डिसेंबर रोजी देशपातळीवर निदर्शने करण्यात येणार असल्याचे खरगे यांनी सांगितले. 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागा वाटपाला अंतिम स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार?

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागा वाटपाबाबत अंतिम स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत निवडणुकीनंतरच निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

खरगे यांच्या नावाची चर्चा

एमडीएमकेचे नेते वायको यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष  मल्लिकार्जून खरगे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवला. तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरगे यांनी या प्रस्तावाला नकार दिला असून आघाडीचे समन्वयक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.  

[ad_2]

Related posts