मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर काम हाती घेतले आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकावर अमेटी युनिर्व्हसिटी (साखळी क्रमांक १०.५०० किमी) आणि मडप बोगदा, तसेच खालापूर पथकर नाक्यादरम्यान हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. 

वाहनाचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (चारचाकी) शेडुंग फाटा साखळी क्रमांक कि.मी ०८.२०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग ४, जुना मुंबई- पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट साखळी क्रमांक कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.


हेही वाचा

शाळेच्या वेळा बदलण्याची शक्यता, वाचा सविस्तर

[ad_2]

Related posts