Virat Kohli : किंग विराट कोहली तातडीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मायदेशी परतला; ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-20 आणि वनडे संघातून माघार घेतलेल्या किंग कोहलीने आता कसोटीमधून माघार घेत तातडीने मायदेशी परतला आहे. कोहली कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे परतला आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. गायकवाड दुखापतीशी झुंजत असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला तगडा झटका बसला आहे. दरम्यान, किंग कोहली कसोटी संघात पुन्हा वेळेत परतणार असल्याची चर्चा आहे.

Cricbuzz च्या वृत्तानुसार कोहली कौटुंबिक परिस्थितीमुळे भारतात परतला आहे. मात्र संपूर्ण प्रकरण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. कोहलीने तीन दिवसांपूर्वी भारतात येण्याची परवानगी घेतली होती. भारतात परतल्यामुळे तो सरावात सहभागी होऊ शकला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रुतुराजला दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. गायकवाड दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे आणि तोपर्यंत ते सावरू शकणार नाही. 

या मालिकेसाठी भारताने युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांचाही संघात समावेश केला आहे. ऋतुराजलाही संधी मिळाली. मात्र दुखापतीमुळे तो बाहेर आहे. इशान किशनलाही स्थान देण्यात आले. मात्र ईशानने या मालिकेतून आपले नाव काढून घेतले होते. त्यामुळे त्याच्या जागी केएस भरतला टीम इंडियात स्थान देण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts