( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mercury Gochar In Scorpio: वैदिक ज्योतिष्य शास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी बुध ग्रहाला वाणी, व्यवसाय, अर्थव्यवस्था, माध्यम आणि बँकिंगचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी बुध संक्रमण करतो तेव्हा या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे.
बुधाच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी आहेत ज्यांना या काळात नवीन नोकरी मिळू शकणार आहे. यासोबत नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी भाग्यशाली ठरणार आहे
मकर रास (Makar Zodiac)
बुधाचे वृश्चिक राशीत होणारं संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या कारकिर्दीतील कामगिरीमुळे तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास दिसून येईल. जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. या काळात मुलांची प्रगती होऊ शकते. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.
तूळ रास (Tula Zodiac)
बुधाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नशीब तुम्हाला साथ देईल. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही कोणतीही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
कर्क रास (Cancer Zodiac)
बुधाची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते. हे वर्ष व्यावसायिकांसाठी शुभ सिद्ध होईल, त्यांना चांगले आर्थिक लाभ मिळतील. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्यही वाढेल. यावेळी तुम्ही कोणत्याही कर्जाची परतफेड देखील करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)