NCP Jitendra Awhad Slams Hasan Mushrif Kolhapur Sanjay Mandlik Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  हे भ्रमिष्ट झाले आहेत, एकाकी पडले आहेत त्यामुळे ते वेगवेगळी वक्तव्य करत आहेत अशा पद्धतीचा पलटवार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)  यांनी केला आहे. जर भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चेमध्ये मी नसतो तर मंत्री झालो असतो का? असा सवाल देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मंत्री हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर दिलंय. एकेरी शब्द वापरणं ही मुश्रीफांची संस्कृती आहे. तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी तुमच्या नादाला लागलो नाही असं उत्तर आव्हाडांनी दिलंय. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकेरी शब्द वापरणे हे त्यांचे संस्कृती आहे. मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनात पाच मिनिटे सुद्धा बोललेलो नाही. 2019 ला पवार साहेबांच्या घरी मीटिंग झाली होती त्यावेळी सगळे नेते उपस्थित होते. त्यावेळीला भाजपसोबत जाण्यासाठी मुश्रीफ यांनी टोकाचा विरोध केला होता. मी पत्रावर सही केली पण बाहेर आल्यावर जयंत पाटील यांना सांगितलं की, मला हे मान्य नाही. जयंत पाटलांना देखील ते मान्य होतं ते पत्र आजही जयंत पाटलांच्या खिशात आहे. 

माझ्या नादाला लागू नका, बोलायला गेलो तर… 

मी कधी कोणाला धोका दिला नाही. एकदा लढाई करायचे ठरवली तर पुढे जो निर्णय होईल तो होईल. सदाशिव मंडलिक यांच्यासोबत तुमचे काय संबंध होते त्यांनी तुम्हाला कुठपर्यंत आणलं हे सर्व कोल्हापूरकरांना माहित आहे. माझ्या नादाला लागू नका, बोलायला गेलो तर मी खूप खोलात जाईल मी माझ्या बापाची कधीच गद्दारी केली नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

फुले शाहू आंबेडकर एका मांडीवर आणि  गोळवलकर दुसऱ्या मांडीवर, अजित पवारांवर निशाणा

अजित पवारांवर देखील जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले,  फुले शाहू आंबेडकर एका मांडीवर आणि  गोळवलकर त्यांच्या एका मांडीवर आहेत. कर्नाटकातील  बुरखा बंदीवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, या देशात कोणी काय खावं? कोणी काय घालावं? कोणी कोणत्या धर्माचा आदेश मानावा हे त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अवलंबून असते. विधानाने दिलेल हे स्वातंत्र्य आहे, संविधान हे कुठल्याही सरकार पेक्षा मोठं असते.

सुनील केदार निर्दोष आहे : जितेंद्र आव्हाड

 नागपूर (Nagpur)  जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) काँग्रेस नेते  सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे . या  विषयी जितेंद्र आव्हाड म्हणाले,  सोमवारी ते उच्च न्यायालया जातील त्यावर उच्च न्यायालय स्थगिती देईल अशी अपेक्षा  माझा मित्र निर्दोष आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 

हे ही वाचा :

‘यालाच सगळं कळतंय का? एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट झालाय’, मुश्रीफांची आव्हाडांवर एकेरी टीका

[ad_2]

Related posts