Hardik Pandya Has A Heel Injury And Is Unlikely To Be Fully Fit Right Now May Be Out Of The India Afghanistan T20I Series

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hardik Pandya India vs Afghanistan : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडला. यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला सुद्धा मुकला. मात्र, त्याने आयपीएलमध्ये गुजरातला टाटा करून मुंबईमध्ये आल्यानंतर चर्चा अजूनही थांबलेली नाही. पांड्या विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता. पांड्या लवकरच पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण आता तशी चिन्हे दिसत नाहीत. रिपोर्टनुसार, हार्दिक भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतूनही बाहेर राहू शकतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून मालिका खेळवली जाणार आहे.

पांड्या भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेतून बाहेर असू शकतो

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार हार्दिक पांड्याला टाचेला दुखापत झाली असून सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त असण्याची शक्यता कमी आहे. पांड्या भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेतून बाहेर असू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप पांड्याबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणाही केलेली नाही.

पांड्याचा फिटनेस संघाला धक्का देऊ शकतो 

महत्त्वाची बाब म्हणजे पंड्याला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मुंबई इंडियन्सने ट्रेड करून कर्णधार बनवले आहे. पांड्या तंदुरुस्त नसल्यास मुंबईचे नुकसान होऊ शकते. मुंबईने चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला पदावरून हटवले आहे. त्याच्या जागी पांड्याला कर्णधार बनवण्यात आले. पण पांड्याचा फिटनेस संघाला धक्का देऊ शकतो.

हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध 2023 वर्ल्डकप दरम्यान खेळला होता. तेव्हापासून तो पुनरागमन करू शकलेला नाही. पांड्याने शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. शेवटचा T20 सामना ऑगस्ट 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला गेला होता. पांड्याने आयपीएल संघ गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले आहे. गेल्या मोसमातही तो गुजरातकडून खेळला होता. संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण आता तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts