Apps Instagram Is The Most Deleted Social Media App In The Year 2023 This Was Revealed In The Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Most Deleted App In 2023 : सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा (Instagram) अविभाज्य भाग बनला आहे. यामुळेच या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये 2023 मध्ये सर्वाधिक डिलीट झालेल्या अॅप्सची माहिती देण्यात आली आहे. 2023 मध्ये हे सर्वात डिलीट झालेले सोशल मीडिया अॅप कोणतं आहे, असे अहवालात उघड झाले आहे. 2023 हे वर्ष संपणार आहे. यंदा सोशल मीडिया युजर्सने अनेक अ ॅप्स इन्स्टॉल केले आहेत, तर असे काही अॅप्स आहेत. जे या वर्षी खूप डिलीट करण्यात आले आहेत. 2023 मध्ये सर्वाधिक डिलीट करण्यात आलेल्या अॅप्समध्ये इन्स्टाग्रामचे नाव असल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल…

या  अहवालानुसार, 2023 मध्ये सर्वात जास्त डिलीट होणारे अॅप म्हणजे इन्स्टाग्राम. दहा लाख लोकांनी गुगलला विचारले की ते त्यांचे इन्स्टाग्राम अॅप कसे डिलीट करू शकतात. म्हणजेच यानुसार दर एक लाख युजर्सपैकी 12,500 लोकांनी गुगलवर इन्स्टाग्राम डिलीट करण्याची माहिती सर्च केली आहे.

इन्स्टाग्रामचे 240 दशलक्ष अॅक्टिव्ह युजर्स

सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे जरी 2023 मध्ये इन्स्टाग्राम सर्वात जास्त डिलीट झाले आहे. पण सोशल मीडिया अॅप्समध्ये अॅक्टिव्ह युजर्सच्या बाबतीत या अॅपने आपलं स्थान कायम ठेवलं आहे. सध्या इन्स्टाग्रामचे 24कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. सध्या सगळ्यांच्यात हातात मोबाईल दिसतो आणि त्यात ते रिल्स बघताना दिसतात. रिल्समुळे सगळे मोठ्या प्रमाणात इंस्ट्राग्रामवर अॅक्टिव्ह दिसतात. 

तसेच यावर्षी अनेक इंस्टाग्राम युझर्जला ब्लू टीक मिळाली आहे. मात्र अनेकांनी प्रयत्न करुनही त्यांना ब्लू टिक मिळाली नाही. जर तुम्हाला ब्लू टिक मिळवायची असे तर तुम्ही काय केलं पाहिजे तेदेखील जाणून घ्या…

ब्लू टिक कशी मिळवाल?

-इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जाऊन खालच्या उजव्या बाजूला दाखवलेल्या 3 ओळींवर क्लिक करावं लागेल.
-त्यानंतर मेटा व्हेरिफाइडवर यावे लागेल. 
-येथे तुम्हाला 699 रुपये शुल्क भरावे लागेल 
-आपले सरकारी ओळखपत्र लागू करावे लागेल. 
-पेमेंट आणि सेटअप पूर्ण केल्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या अकाऊंटवर ब्लू टिक दिसेल.

पेमेंट संपलं की ब्लू टिक गायब

जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत राहाल तोपर्यंतच ब्लू टिक तुमच्या अकाऊंटवर राहील. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमची ब्लू टिक प्रोफाईलमधून काढून टाकली जाईल. मेटा व्हेरिफाईडचे सदस्यत्व घेतल्यास आपल्याला वेगवान फास्ट कस्टमर सपोर्ट आणि  एक्सक्लूसिव फीचर्स मिळतील. इन्स्टाग्रामप्रमाणेच आता ट्विटरवरही पैसे देऊन ब्लू टिक मिळवता येणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Amazon Prime Lite membership : ॲमेझॉन प्राईम लाइट सब्सक्रिप्शन आता स्वस्त्यात, 365 दिवसांचा प्लॅन कितीला मिळणार?

[ad_2]

Related posts