Bhiwandi Crime : डान्सबारमधून 8 लाखांची खंडणी मागणाऱ्या भाजप नगरसेवकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
भिवंडी : भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गलगत डान्सबार चालकांना धमकावून 8 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून भाजप नगरसेवकाला रंगेहात अटक केली. या नगरसेवकाकडून 27 हजार रुपये देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी हितेश कुंभार (वय 33, अकोले नगरपंचायत) साथीदार देवेंद्र खुटेकर व राकेश कुंभकर्ण यांना अटक केली आहे.

8 लाख रुपयांची मागणी

मुंबई नाशिक महामार्गालगत कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिवंडी बायपास येथे अनेक डान्स बार आहेत. त्यापैकी लैला डान्सबार चालक संतोष भोईर व हरीश हेगडे पार्टनरशिपमध्ये चालवतात. या डान्सबारमध्ये हितेश कुंभार येऊन मी मुंबई भाजपचा नगरसेवक आहे व तुमचे बार चालवायचे असेल तर आर्केस्ट्रा बारचे 5 लाख रुपये व सर्विस बारचे 3 लाख रुपये असे एकूण 8 लाख रुपयांची मागणी केली. 25 हजार रुपये महिन्याला हप्ता द्यावा लागेल अशी डान्सबार चालकाकडे मागणी केली. त्यावेळी बार चालकाने सांगितले की मी इतर डान्स बार चालकांना विचारून सांगतो. त्यानंतर हितेश कुंभार यांनी बारचालकाकडे गुडलक स्वरूपात पैशाची डिमांड केली. यावेळी सर्वांशी चर्चा करून गुडलक देऊ असे सांगितल्यानंतर हितेश कुंभार आपल्या साथीदारांसह निघून गेले. दुसऱ्या दिवशी हितेश कुंभार पुन्हा लैलाबारमध्ये साथीदारांसह आले आणि खंडणीची मागणी केली. त्यावेळी 9 बार चालकांनी प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे एकूण 27 हजार रुपये जमा केले होते.

डान्सबार कसे चालवता हे मी पाहतो अशी धमकी

परंतु, हितेश कुंभार यांनी वन टाइम रकमेबद्दल चर्चा केली आणि ती रक्कम आठ लाख रुपये होती. त्यावेळी बार चालकांनी सांगितले की ही रक्कम फार मोठी आहे हे देणं शक्य होणार नाही. आम्हाला थोडा वेळ पाहिजे. परंतु, हितेश कुमार यांनी सांगितले की जर तुम्ही वन टाइमचे पैसे दिले नाही तर तुम्ही डान्सबार कसे चालवता हे मी पाहतो अशी धमकी दिली. त्यावेळी बार चालकांनी आम्हाला थोडा वेळ हवा असल्याचे सांगत बार चालक संतोष भोईर यांनी बारच्या बाहेर येऊन थेट कोनगाव पोलीस स्टेशन गाठलं व घडलेली सर्व हकीकत पोलिसांसमोर मांडली. पोलिसांनी तत्काळ घटनाचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेत सापळा रचला व पोलिस देखील लैला डान्सबार येथे दाखल झाले आणि मुंबईचे भाजप नगरसेवक असल्याचे सांगणारे हितेश कुंभार यांनी आपल्या साथीदारांसह वन टाइम रकमेची डिमांड केली व गुडलकचे 27 हजार रुपये लैला डान्स बार चालकांकडून स्वीकारत असताना पोलिसांनी भाजपा नगरसेवक हितेश कुंभारसह त्याच्या दोन साथीदारांना रंगेहाथ अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. कोनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

मुंबईचा नगरसेवक नाही, तर नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीचा नगरसेवक

मुंबई येथील भाजप नगरसेवक असल्याचे सांगत भाजप नगरसेवक हितेश कुंभार यांनी भिवंडीत बार चालकांकडून खंडणीसह हप्ता वसुली प्रकरणामध्ये कोनगाव पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. परंतु पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश कुंभार यांच्या बद्दल चौकशी केली असता हितेश कुंभार हे मुंबईचे नगरसेवक नसून नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर भाजप नगरसेवक हितेश कुंभार यांनी 1 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरात नियमांची पायमल्ली करणाऱ्या डान्सबार वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करता त्यांनी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. तसेच पोलिस महासंचालक यांच्याकडेही तक्रार केली आहे.

परंतु, दुसरीकडे याच डान्स बार चालकांकडून मोठी रक्कम वसूलण्याचा प्रयत्न देखील भाजपा नगरसेवक हितेश कुंभार यांच्याकडून केला जात होता. भिवंडीतील डान्सबार चालकांकडून एकूण आठ लाख रुपयांची मागणी करण्यात आली ज्यामध्ये गुडलक म्हणून 27 हजार रुपये घेताना कोनगाव पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कोनगाव पोलीस करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Bhiwandi Accident: भिवंडीत दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

[ad_2]

Related posts