Shani Shingnapur Workers Protest From 25 December For 10 Demands Ahmednagar Maharashtra Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर: शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या (Shani Shingnapur Worker Protest) कर्मचाऱ्यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संपावर जाण्याचा निश्चय केला आहे. अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदनिश्चिती करावी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध 10 मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. त्यातील किरकोळ मागण्या या देवस्थान ट्रस्टकडून पूर्ण करू असं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र मुख्य दोन मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील चारशे कर्मचारी हे सोमवारपासून संपावर जात आहेत. आपल्या विविध 10 मागण्यांसाठी त्यांनी संपाचा इशारा दिला होता. याबाबत देवस्थान ट्रस्टसोबत कर्मचाऱ्यांची चार वेळेला बैठक झाली. मात्र चारही वेळेला बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे या काळात भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 

शनिशिंगणापूर देवस्थानचे सर्व कर्मचारी येत्या दिनांक 25 डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. या संदर्भात देवस्थानच्या कामगार युनियनच्या वतीनं देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात 25 मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत. 

काय आहेत मागण्या? (Shani Shingnapur Worker Protest)

  • सर्व कामगारांच्या अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा आणि पदनिश्चिती करा. 
  • दि. 1. 10. 2003 च्या करारानुसार पाचव्या वेतन श्रेणी प्रमाणे 2003 ते 2023 पर्यंतचा फरक अदा करून मागील फरकासह सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा.
  • कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करून घ्या.
  • सर्व कामगारांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा मोफत करा.
  • कोरोना महामारीत मरण पावलेल्या कामगारांच्याच्या वारसांना नुकसान भरपाई द्या.
  • मयत कामगारांच्या घरातल्या एका व्यक्तीला देवस्थानच्या सेवेत समाविष्ट करून घ्या.
  • प्रॉव्हिडंट फंड कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.
  • देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन घडल्यास किंवा तसं आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी सदर कर्मचाऱ्यांची चौकशी समितीमार्फत चौकशी करावी.
  • त्या चौकशी समितीमध्ये कामगार युनियनचे दोन संचालक प्रतिनिधी घ्या.
  • कामगारांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी 58 वरून 60 वर्षे करा.
  • कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार बोनस किंवा सानुग्रह अनुदान म्हणून बोनस देण्यात यावा.
  • देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातला राहिलेला अर्धा पगार अदा करण्यात यावा.

शनिशिंगणापूर देवस्थानच्या कामगार युनियननं 25 डिसेंबरपासून संप करण्याचा निर्णय घेतल्याने नाताळ आणि सलग सुट्ट्याच्या निमित्ताने शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांना गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts