Mumbai Indians Has Been Traded Hardik Pandya For Rs 100 Crore For Ipl 2024 Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hardik Pandya Mumbai Indians : आयपीएल 2024 हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला  (Hardik Pandya) ट्रेड करत सर्वांनाच धक्का दिला होता. हार्दिक पांड्या दोन वर्षांपासून गुजरात संघाची धुरा संभाळत होता. पण आता 2024 आयपीएल हंगामाआधी तो मुंबईचा नायक झालाय. पाच वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईने हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांच्या करार करत ताफ्यात घेतले होते. पण या व्यतिरिक्त ट्रान्सफर फी देखील दिली आहे. ज्याविषयी फक्त आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिल समितीला माहिती होते. अशात आता या रक्कमेचा खुलासा झाला आहे. ही रक्कम आता समोर आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांच्या भुवाया उंचावल्या आहेत. 

हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सनं लिलावाआधी ट्रेड केलं. त्यावेली हार्दिकला मिळणारे 15 कोटी रुपये मुंबईच्या पर्समधून कमी झाले. तर तीच  रक्कम गुजरातच्या पर्समध्ये जमा झाली. पण पांड्याच्या पगारापेक्षा अधिक रक्कम गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फी म्हणून मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार मुंबईनं तब्बल 100 कोटी रुपये (Mumbai Indians Paid 100 Crore For Hardik Pandya) ट्रान्सफर फी मोजून हार्दिकला आपल्या ताफ्यात दाखल केलेय. 

हार्दिक पांड्यासारख्या तगड्या खेळाडूला सोडण्यासाठी गुजरातने 100 कोटींची रक्कम मागितली असेल, असे अनेकांचं मत आहे. 2022 मध्ये गुजरात संघ आयपीएलमध्ये पहिल्यांदा दाखल झाला होता. त्यावेळी गुजरातची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने पदार्पणातच चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर पुढील हंगामात म्हणजे 2023 मध्ये गुजरात संघाने फायनलपर्यंत धडक मारली होती. चेन्नईकडून पराभव झाल्यामुळे गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळेच हार्दिक पांड्याला मुंबईल ट्रेड करणं गुजरातसाठी खूपच कठीण निर्णय होता. मुंबईकडून 100 कोटींची ट्रान्सफर फी घेतलेल्या गुजरात संघाच्या मुल्यांमध्ये आता तेवढीच वाढ झाली आहे. पुढील वर्षी संघाचे खाते बंद झाल्यावर संघाचे मुल्य 100 कोटींनी वाढणार आहे. 

हार्दिक पांड्याकडे मुंबईची धुरा सोपावल्यानंतर चाहत्यांमध्ये रोष होता. पाच वेळा आयपीएल चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला मुंबई बाजूला केलं. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती. सोशल मीडियावर चाहत्यांचा प्रचंड संताप होता. काहींनी मुंबई इंडियन्सचे झेंडेही जाळले होते. 



[ad_2]

Related posts