Daniel Sams Takes 4 Wicket On 4 Ball In Big Bash League Australia

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Daniel Sams : IPL 2024 चा मिनी लिलाव दुबईतील कोका कोला एरिनात पार पडला. खेळाडूंच्या लिलावाच्या बाजारात ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. पॅट कमिन्स सुद्धा महागडा गोलंदाज ठरला. दुसरीकडे स्टार्क आणि पॅट कमिन्सचा देशबांधव आणि डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स आयपीएल 2024 च्या लिलावात विकला गेला नाही. त्याच्यावर फ्रेंचायझी बोली लागलीच नाही. डॅनियल सॅम्सची मूळ किंमत दीड कोटी रुपये होती. मात्र, आता त्याची कामगिरी पाहून फ्रँचायझींना पश्चाताप होत असेल, यात शंका नाही.

डॅनियल सॅम्स बिग बॅश लीगमध्ये चमकला

बिग बॅश लीग 2023 मध्ये मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर यांच्यात सामना झाला. या सामन्यात सिडनी थंडरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॅनियल सॅम्सने खळबळ उडवून दिली. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 33 धावा देत 4 बळी घेतले. सॅम्सने सेट बॅट्समन ब्यू वेबस्टर, टॉम रॉजर्स, उसामा मीर आणि लियाम डॉसन यांच्या विकेट घेतल्या. मेलबर्नच्या डावातील शेवटचे षटक डॅनियल सॅम्स टाकत होता. त्याच्या षटकातील शेवटच्या चार चेंडूंवर चार विकेट्स आल्या.

मात्र, मध्येच मार्क स्टेकेटी धावबाद झाला. त्यामुळे डॅनियलला त्याची हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही. डॅनियलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे. सॅम्सने आयपीएलमध्ये खेळलेल्या एकूण 16 आयपीएल सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत.

सिडनी थंडरने हा सामना 5 गडी राखून जिंकला

मेलबर्न स्टार्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकात 172 धावा करून सर्वबाद झाले. वेबस्टरने संघाकडून सर्वाधिक 59 धावा केल्या होत्या. सिडनीने 173 धावांचे लक्ष्य 5 विकेट्स आणि 10 चेंडू शिल्लक असताना जिंकले. सिडनीकडून अॅलेक्स हेल्सने सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय मेलबर्नकडून वेबस्टरने 4 बळी घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts