Maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar Case Has Been Registered Against Kalicharan Maharaj In Chhatrapati Sambhaji Nagar Rural Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Case Has Been Registered Against Kalicharan Maharaj: नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत रहाणाऱ्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्यावर आणखी एक गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी स्वतः फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल केला आहे. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनजागरण सभेत बोलताना कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे कालीचरण महाराज यांच्यासह सिल्लोड येथील भाजपचे शहराध्यक्ष आणि इतर चार लोकांविरुद्ध विविध कलमानव्ये सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे शनिवारी (13 मे रोजी)  हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी रुद्राक्ष वाटप करण्यात आले. त्यामुळे सभेसाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित पाहायला मिळाली. मात्र यावेळी बोलताना कालीचरण महाराज आणि आयोजकांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी स्वतः फिर्यादी होऊन या तक्रार दिल्याने रविवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात कालीचरण महाराज आणि सिल्लोड येथील भाजपचे शहराध्यक्ष आणि इतर चार लोकांविरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये हिंदू जागरण समितीचे कालीचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग (रा.अकोला) यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक तथा सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया, या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते सुनिल त्र्यंबक जाधव (मोढा बुद्रुक), आरएसएसचे बौद्धिक जिल्हाप्रमुख केतन कल्याणकर (रा.सिल्लोड) या चार लोकांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यतीन कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले.

यामुळे गुन्हे दाखल…

  • कालीचरण महाराज यांनी या सभेत भडकावू भाषण दिले.
  • दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले.
  • इतर आयोजकांनी चिथावणी दिली नियम व अटींचे पालन केले नाही.
  • त्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल 

गुन्हे मागे घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी 

सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनजागरण सभेत बोलताना कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या सभेत राडा झाला नाही कुणाची मने दुखावली नाही किंवा कुणी नागरिकांनी यावर आक्षेप घेतला नाही. असे असताना केवळ राजकीय षडयंत्रामुळे पोलिसांनी दबावाखाली भाजप पदाधिकारी व कालीचरण महाराज यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी भाजप पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

जलील म्हणतात कालीचरण महाराज जेलमध्ये जाणार; तर हाती चले बजार…, कालीचरण महाराजांचं प्रत्युत्तर

[ad_2]

Related posts