Best Deals On Smartwatches You Can Get Up To 80 Percent Discount

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Best Smartwatch : आजची घड्याळे फक्त वेळच सांगत नाहीत. (Smart Watch Offers) तर आपल्या फिटनेसचीही काळजी घेतात. स्मार्टवॉचमध्ये अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. मग ते खेळाच्या उपक्रमांसाठी असो, कोणाशी तरी संपर्क साधण्यासाठी असो किंवा आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी असो. आजकाल हे सर्व फीचर्स स्वस्त स्मार्टवॉचमध्ये मिळतात. मात्र, बाजारात लाखो पर्याय असल्याने योग्य स्मार्टवॉच खरेदी करणे खूप अवघड होऊन बसतं. तुमचं काम सोपं व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला इथे 4 बेस्ट घड्याळांबद्दल सांगत आहोत, ज्यावर सध्या बंपर डिस्काउंट दिला जात आहे.

Best Smartwatch Offers : स्मार्टवॉचवरील ऑफर्स पाहा…

HONOR Watch GS 3 Smartwatch : यात 1.43 इंचाचा अमोलेड गोल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टवॉचची किंमत 18,999 रुपये आहे परंतु सध्या आपण 16,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हेल्थ फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टवॉचमध्ये आपल्याला 8 चॅनेल AI हार्ट रेट मॉनिटर, स्लीप अँड स्ट्रेस मॉनिटर, SPo2 मॉनिटर आणि 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड मिळतात. हे घड्याळ 14 दिवसांपर्यंत बॅटरी सपोर्ट देते आणि ब्लूटूथ कॉलिंगसह ड्युअल जीपीएससोबत येते.

Samsung Galaxy Watch 5 Bluetooth :  या स्मार्टवॉचवर सध्या 44 टक्के सूट दिली जात आहे. अॅमेझॉनवरून (Amazon) हे वॉच तुम्ही 33,999 रुपयांऐवजी फक्त 18,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला स्लीप ट्रॅकिंग, बीआयए  आणि ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सरची सुविधा मिळते. ही स्मार्टवॉच फक्त अँड्रॉइड फोनसोबत काम करते आणि फिटनेस फ्रीक लोकांसाठी सर्वोत्तम आहे. यात 90 हून अधिक व्यायाम आहेत.

Fire-Boltt Huracan : यात तुम्हाला 1.95 इंचाचा आयपीएस डिस्प्ले मिळतो. या वॉचची खासियत म्हणजे यात वायरलेस चार्जिंग, 108 स्पोर्ट्स मोड, ब्लूटूथ कॉलिंग, व्हॉईस असिस्टन्स, एनएफसी कंट्रोल आणि स्मार्ट नोटिफिकेशनसह अनेक फीचर्स मिळतात. याची किंमत 19,999 रुपये आहे परंतु सध्या अॅमेझॉनवर 65% सूट दिली जात आहे आणि आपण 6,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Nu Republic Creed Ultra Smartwatch : या घड्याळावर 83 टक्के सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही फक्त 2,199 रुपयांत खरेदी करू शकता. यात तुम्हाला हे सिरी आणि आयपी 67  रेटिंगव्यतिरिक्त 200  हून अधिक वॉच फेस, 20 दिवसांसाठी स्टँडबाय सपोर्ट, 2.0 एचडी आयपीएस डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग आणि म्युझिक मिळते.

इतर महत्वाची बातमी-

Gmail  Storage : प्रमोशनल Mails मुळे कंटाळला आहात? ‘ही’ ट्रिक वापरा अन् प्रमोशनल Mails ची चिंता विसरा!

[ad_2]

Related posts