Ahmednagar Crime Lift To Strangers At Night And Robbed The Car Driver Hit Head With Hammer Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर: माणुसकीच्या नात्याने एखाद्याला आपल्या गाडीतून रात्रीच्या वेळी लिफ्ट देणं किती महागात ठरू शकते याची प्रचिती अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) एका वाहन चालकाला आली आहे. गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या डोक्यात जबर वार केला आणि जखमी केलं. त्यानंतर या चोरांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. 

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडा येथील सचिन पठारे आपल्या चारचाकी वाहनातून सुपा येथे त्यांच्या कंपनीचे मॅनेजर यांना घरी सोडून परतत असताना रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना लिफ्ट मागितली. या प्रवाशांना गाडीमध्ये बसून घेऊन आले असता मागच्या सीटवर बसलेल्या या दोन अनोळखी व्यक्तीपैकी एकाने हातोड्याने सचिन पठारे यांच्या डोक्यावर वार करून जबरी जखमी केले आणि त्यांची गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

पोलिसांनी चक्रे फिरवली

या प्रकरणी सचिन पठारे यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एक टीम बनून आरोपींचा शोध सुरू केला. 

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित गाडी हे कोपरगाव दिशेने गेली असल्याचे निष्पन्न केलं. त्यातच गुप्त बातमीदारमार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, संबंधित आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन कोपरगाव- सिन्नरच्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर थांबले असल्याची माहिती मिळाली.

आरोपींना जेरबंद

मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शिवम मातादिन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतमला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता, रोख रक्कम ,मोबाईल आणि संबंधित कार तसेच गुन्ह्यात वापरलेला हातोडा पोलिसांनी हस्तगत केला. 

पुढील तपासासाठी या आरोपींना सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र रात्रीच्या वेळी आपण गाडीमध्ये एकटेच असलो तर अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांनी व्यक्त केले आहे.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts