[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India vs South Africa Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत (Test Series) टीम इंडिया (Team India) बॅकफूटवर आहे. बुधवारी कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला 11 धावांची आघाडी मिळाली आहे. टेस्ट सीरिजच्या (Test Cricket) दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजीसह गोलंदाजीही ढासळली. दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरने दमदार खेळी केली. एल्गर शतकी खेळी करुन नाबाद आहे. भारतीय फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. टीम इंडियाची खेळी मात्र पुरती ढासळल्याचं दिसत आहे. केएल राहुलशिवाय कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आलेली नाही.
टीम इंडियाचा खराब फलंदाजी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केएल राहुल वगळता कोणत्याही खेळाडूला जास्त धावा काढता आलेल्या नाहीत. केएल राहुलने 14 चौकार आणि 4 षटकार ठोकत 101 रनांची शतकी खेळी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 17 धावांवर माघारी परतला तर रोहित शर्मा 5 धावांवर आऊट झाला. शुभमन गिल अवघ्या दोन धावा करून तंबूत परतला. विराट कोहली 38 आणि श्रेयस अय्यर 31 धावांवर बाद झाले. खराब फलंदाजीमुळे या कसोटी मालिकेत भारत बॅकफूटवर असल्याचं दिसत आहे.
Bad light brings an end to Day 2.
South Africa reach 256/5, with a lead of 11 runs.
Scorecard ▶️ https://t.co/032B8Fn3iC#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/XngpVF2kcr
— BCCI (@BCCI) December 27, 2023
डीन एल्गरला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश
फलंदाजांसह टीम इंडियाच्या गोलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट गमावून 256 धावा केल्या होत्या. शतकानंतरही डीन एल्गरला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं. एल्गरने 211 चेंडूत 140 धावा केल्या, यामध्ये 23 चौकारांचा समावेश आहेत. एल्गर भारतीय गोलंदाजांवर वरचढ ठरल्याचं दिसत असून तो नाबाद आहे. त्याच्यासोबत डेव्हिड बेडिंगहॅमनेही शानदार अर्धशतकी खेळी केली, मात्र, नंतर तो बाद झाला.
सिराज आणि शार्दुलची गोलंदाजी महागात
भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. प्रसिध कृष्णाला एक विकेट घेता आली. कृष्णा आणि सिराजने विकेट घेतल्या पण त्यांनी जास्त धावा दिल्या. शार्दुल ठाकूरही महागात पडला. शार्दुलने 12 षटकात 57 धावा दिल्या, तर सिराजने 15 षटकात 63 धावा दिल्या. टीम इंडियाला आता तिसर्या दिवशी चांगली गोलंदाजी करून डीन एल्गरला बाद करण्याची गरज आहे.
[ad_2]