Australia In Cricket 2023 Won The World Cup And WTC Final Also Retained The Ashes Under Leading Of Pat Cummins

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pat Cummins In 2023 : पॅट कमिन्सला 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून खूप यश मिळाले. कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. अनेक आघाड्यांवर चमत्कार करून आपली जादू पसरवली. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत पॅट कमिन्स ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. 

जाणून घेऊया कमिन्सने या वर्षी कर्णधार म्हणून कोणती मोठी कामगिरी केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव

जूनमध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

अॅशेस कायम ठेवल्या

2023 मध्ये खेळली गेलेली अॅशेस मालिका अनिर्णित राहिली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अॅशेस राखल्या. मागील अॅशेस ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. अशाप्रकारे पॅट कमिन्सने अॅशेस कर्णधार म्हणून कायम ठेवली. 2023 मध्ये खेळलेली अॅशेस 2-2 अशी बरोबरीत होती. या मालिकेतील पहिले 2 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि चौथा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर पाचव्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली.

ऑस्ट्रेलियाने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला

भारतीय भूमीवर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला.

IPL 2024 साठी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बोली

आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधाराला 20.25 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले.

बॉक्सिंग डे कसोटीत ‘प्लेअर ऑफ द मॅच’

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत 10 बळी घेतले. कमिन्सने दोन्ही डावात 5-5 विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts