WTC Final 2023 India Vs Australia At Oval London‎

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


WTC Final 2023, IND vs AUS: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे.  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. याअगोदर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून टीम इंडिया इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 

[ad_2]

Related posts