Tyre Inspection Center Started By RTO At Samruddhi Expressway Shirdi For Avoding Accident

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samruddhi Mahamarg Shirdi :  समृद्धी महामार्गावर रोजच अपघातांच्या घटना समोर येत असून या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिवहन विभागाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या टायरची तपासणी करण्यासाठी टायर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे आतातरी अपघातांच्या संख्येत घट होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहेमहाराष्ट्रातील महत्वाचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या समृद्धी महामार्ग पहिल्यापासून चर्चेत आहे. वर्षभरापूर्वी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाले. तेव्हापासून अपघातांची मालिका सुरू आहे. तर आता मागील महिन्यात 26 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले. मात्र या टप्प्यातही अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावरील झालेल्या मागील अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साधारण वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून टायर तपासणी केंद्र उभारण्यात आले असून यापुढे वाहनाची तपासणी करण्यात आले आहे. 

हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी आणि नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर आज परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांच्या हस्ते टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची टायरसह वाहनाची मोफत तपासणी केली जाणार आहे.

हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर व दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा वाहतूकीसाठी सुरू झाला आहे. समृध्दी महामार्गावरील बहुतांशी अपघात हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत. त्यामुळे अशा अपघातांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे..

मोफत टायर तपासणी केंद्र….

या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त विवेक भिमानवार म्हणाले की, उपक्रमात वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर , चेक यंत्राचे वितरण या टायर तपासणी सुविधा मोफत दिल्या जाणार आहे.

[ad_2]

Related posts