Maharashtra Weather Update News How Will The Weather Be In Maharashtra Between 1st And 7th January         

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं ढगाळ हवामान तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे दोन दिवस बाकी आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातील राज्यातील हवामान नेमकं कसं असेल, याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळं थंडीचा कडाका काहीसा कमी राहिल. पाहुयात सविस्तर माहिती. 

कुठं कसं असेल हवामान?

मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण 22 जिल्ह्यात 1 ते 7 जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची देखील शक्यता असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तर मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे म्हणाले.  

किमान तापमान हे 16 अंश से. तर कमाल तापमान 30 अंश से राहणार

संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे 16 डिग्री से. ग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री से. ग्रेड  दरम्यान जाणवत असून 1 ते 7 जानेवारी दरम्यान ह्याच पातळीत राहू शकतात. ही दोन्हीही तापमाने दरवर्षी या काळात नेहमीसारखी जशी असतात तशीच सरासरी तापमानाच्या पातळीत असून, त्यात विशेष चढ उतार सध्या तरी जाणवणार नाही, असेच वाटत असल्याचे मामिकराव खुळे म्हणाले. एकापाठोपाठ आदळणाऱ्या पश्चिमी झंजावातातुन गेल्या पंधरवाड्यापासून संपूर्ण उत्तर भारतात चालु असलेला धुक्याचा कहर अजूनही तेथे कायम आहे. महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा विशेष असा काहीही परिणाम जाणवणार नाही. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेचीच बाजू समजावी असं माणिकराव खुळे म्हणाले.

देशात कसं असेल हवामान?

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या देशातील अनेक भागात थंडी सुरू आहे. सकाळी धुक्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस थंडीची शक्यता आहे. याशिवाय 30 आणि 31 डिसेंबरला हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं सावट! वर्षाअखेर थंडी आणखी वाढणार; हवामान विभागाकडून अपडेट

 

[ad_2]

Related posts