Team India Second Defeat In A Row Australia Won The Match By Three Runs Also Series Richa Ghosh Played Iconic Innings With 96 Runs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन महिलांनी टीम इंडियाचा अवघ्या तीन धावांनी पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाची विकेटकीपर ऋचा घोषने झुंजार 96 धावांची खेळी केली. तिचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकल्याने सुद्धा मोठी निराशा झाली. दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी करताना पाच विकेट घेत फलंदाजीतही चमक दाखवली.  

सामन्याच्या एका क्षणी टीम इंडिया सहज जिंकेल असे वाटत होते, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हे होऊ दिले नाही. 259 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 50 षटकांत 8 गडी गमावून केवळ 255 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून ऋचा घोषने 96 धावांची खेळी खेळली, ती पूर्णपणे निरुपयोगी ठरली.

दुसरी वनडे गमावण्याबरोबरच भारतीय संघाने मालिकाही गमावली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 8 विकेट गमावत 258 धावा केल्या. सलामीवीर फोबी लिचफिल्डने संघाकडून सर्वात मोठी 63 धावांची खेळी खेळली. याशिवाय अॅलिसा पेरीने 50 धावा करत संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला. यानंतर, उर्वरित काम गोलंदाजांनी केले, ज्यांनी भारताला 259 धावा करण्यापासून रोखले. ऋचा घोष फलंदाजी करत असताना टीम इंडिया सहज जिंकेल असं वाटत होतं, पण ऋचाच्या विकेटनंतर विजय ऑस्ट्रेलियाच्या हातात गेला.

आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर 259 धावांचे आव्हान ठेवले.  या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकांत 8 बाद 255 अशी मजल मारता आली. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. मात्र, दोन चौकारासह 13 धावा केल्याने तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

सलामीवीर यस्तिका भाटिया अवघ्या 14 धावांवर बाद झाली. स्मृती मानधनाला चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करण्यात अपयश आले. स्मृती 34 धावा करून परतली. यानंतर रिचा आणि जेमिना यांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करत आव्हान जिवंत ठेवले होते. जेमिना 34व्या षटकात बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर सुद्धा स्वस्तात परतली. त्यानंतर 96 धावांवर रिचा 44व्या षटकात बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा आशा तिथेच मावळल्या. मधल्या फळीतील दिप्ती शर्माने 36 चेंडूत 24 धावा करत चिवट झुंज दिली, पण तिची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील निराशा पराभवाला कारणीभूत ठरली. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts