Gujrat Titans Will Wear Their Special Lavender Jersey To Support Those Battling Cancer ; गुजरातच्या संघाने प्ले ऑफच्या सामन्यांपूर्वी जर्सीचा रंग का बदलला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : गुजरात टायटन्सचा संघ जेव्हा आज मैदानात उतरला तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण गुजरातच्या संघाची जर्सी ही निळ्या रंगाची असते. पण आज मात्र गुजरातचा संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्यांच्या जर्सीचा रंग हा लॅव्हेंडर असल्याचे पाहायला मिळाले. प्ले ऑफच्या शर्यतीला सुरुवात होण्यापूर्वी गुजरातच्या संघाने आपल्या जर्सीचा रंग का बदलला, याचे कारणही आता समोर आले आहे.गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या जेव्हा टॉससाठी आला तेव्हा तो एका वेगळ्याच जर्सीत पाहायला मिळाला. आतापर्यंत अशी जर्सी आयपीएलमध्ये पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे हार्दिक जेव्हा टॉससाठी मैदानाता आला तेव्हा त्याने या रंगाची जर्सी का घातली आहे, याचा विचार सर्व जण करत होते. पण त्यानंतर काही वेळातच गुजरातच्या संघाने अशी जर्सी का घातली आहे, हे समोर आले. गुजरातच्या संघाने कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आपल्या जर्सीचा रंग बदलल्याचे समोर आहे. एका सामन्यासाठी गुजरातच्या संघाने ही जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ ग्लोबल वॉर्मिंगच्या पृथ्वीला जे नुकसान होते त्याच्याविरोधात ते हिरव्या रंगाची जर्सी परीधान करत असतात. आरसीबीनंतर आता गुजरातच्या संघाने एका चांगल्या गोष्टीची जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं


गुजरात साखळीतील अव्वलस्थान भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना हैदराबादच्या बाद फेरीच्या आशा जवळपरास आटोपल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात रशीद खान वगळता गुजरातच्या अन्य खेळाडूंनी निराशा केली होती. ‘एक संघ म्हणून आम्ही साफ अपयशी ठरलो होतो. गोलंदाजीत घोर निराशा केली. योजनेची अंमलबजावणी करता आली नाही,’ असे हार्दिक पंड्याने मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर सांगितले होते. रशीद खान सोडल्यास गुजरातचे सर्वच गोलंदाज मुंबईविरुद्ध अपयशी ठरले होते. नव्या चेंडूवर मोहीत शर्माने निराशा केली. महंमद शमीचाही सूर हरपला होता. गुजरातच्या खालावलेल्या कामगिरीचा फायदा घेण्याची संधी हैदराबाद साधण्याची शक्यता कमी आहे. अनमोलप्रीत सिंग, मयंक अगरवाल, राहुल त्रिपाठीला सूर गवसलेला नाही. उमरान मलीकला संघाबाहेर ठेवत हैदराबादने गोलंदाजी जास्तच कमकुवत केली असल्याचे मानले जात आहे.

[ad_2]

Related posts