Rohit Sharma: Former Cricketer Questions On Rohits Leadership In Test Cricket Marathi News Cricket News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs SA 1st Test) दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारुण पराभव केला. यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रोहितवर माजी क्रिकेटपटूंनी टीका केलीये. पहिल्या कसोटीत रोहितला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू बद्रीनाथ (Badrinath) याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. एका खराब कसोटी प्लेअरकडे टीम इंडियाचे नेतृत्व का देण्यात आले आहे? असा सवाल बद्रीनाथने केला आहे. शिवाय, रोहित नाही तर विराट कोहली भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार असायला हवा, असे मतही बद्रीनाथने मांडले आहे. 

बद्रीनाथ म्हणाला, विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व का करत नाही? मी हा प्रश्न विचारु इच्छित आहे. विराट एक उत्कृष्ट कसोटी प्लेअर आहे. विराट आणि रोहितमध्ये तुलनाही करता येणार नाही. विराट कसोटी क्रिकेटमधील मोठा खेळाडू आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक देशात जात धावा केल्या आहेत. विराटकडे कसोटी संघाचे कर्णधारपद द्यायला हवे, मात्र, ते रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला अद्याप स्वत:ला सिद्ध करता आलेली नाही. त्यामुळे अनेकदा तो संघाच्या बाहेरही होता. एवढं काही असूनही रोहितकडेचं कर्णधारपदाची धुरा का देण्यात येते? असे अनेक सवाल बद्रीनाथने त्याच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. 

विदेशात रोहितचा फ्लॉप शो (Rohit Sharma)

रोहितची काहीअंशी कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चांगली आहे. मात्र, विदेशात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सुमार राहिलीये. या 4 देशांत रोहितने 21 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1182 धावा केल्या आहेत. 21 कसोटी सामन्यांमध्ये त्याला केवळ 1 शतक झळकावता आले आहे. विराटने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलय. यातील 40 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे. विराटच्याच नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीआधीच भारताला धक्का,  शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त 

IND vs AUS : अटीतटीच्या लढतीत टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; ऑस्ट्रेलियाचा तीन धावांनी निसटता विजय अन् मालिकाही जिंकली

[ad_2]

Related posts