David Warner ODI Retirement: David Warner’s Retirement From ODI Cricket At The Beginning Of The New Year MARATHI NEWS CRICKET NEWS

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

David Warner ODI Retirement : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाचा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मोठी घोषणा केलीये. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान सिडनीच्या मैदानावर कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस अगोदर वॉर्नर हा मोठा निर्णय घेतलाय.  37 वर्षीय वॉर्नरचा भारतात खेळवण्यात आलेल्या 2023 च्या वनडे वर्ल्डकपदरम्यानच निवृती घेण्याचा विचार होता.

“माझी पत्नी कँडिस आणि माझ्या 3 मुलींना मला जास्ता वेळ देण्याची गरज आहे”,असे मत डेव्हिड वॉर्नरने मांडलय. 2025 मध्ये खेळवण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला तगड्या सलमीवीराची गरज पडली तर संघात परतेन असेही वॉर्नरने स्पष्ट केले.चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत वॉर्नर म्हणाला, “मला माहिती आहे की, 2 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येईल. जर मी 2 वर्षानंतरही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी शकलो. तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात परतेल. मी संघासाठी कधीही उपलब्ध असेल.”  

वॉर्नरची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी (David Warner In ODI CRICKET) 

डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 161 सामने खेळत 6932 धावा केल्या आहेत.त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 97.26 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यामध्ये 22 शतके आणि ३३ अर्धशतकांचा  समावेश आहे. डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना खेळवण्यात आला होता. रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क आणि स्टिव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नच्या नावावर आहे. 

2023 च्या वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरची दमदार कामगिरी 

डेव्हिड वॉर्नरने 2023 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केलीये. त्याने कांगारुंच्या संघातून सर्वाधिक धावा केल्या. वॉर्नरने वर्ल्डकपमध्ये 11 सामने खेळले. त्याने वर्ल्डकपमध्ये 108.29 च्या स्ट्राईक रेटने 535 धावा काढल्या. यामध्ये 2 शतकांचाही समावेश होता. त्याने पाकविरुद्धच्या सामन्यात 163 धावांची खेळी केली होती. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. 

टी 20 क्रिकेट खेळतच राहणार वॉर्नर (David Warner)

वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही डेव्हिड वॉर्नर टी 20 क्रिकेट खेळतच राहणार आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळण्यापासून तो केवळ एक पाऊल दूर आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्येही तो त्याच दमाने मैदानात उतरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Viral News : क्रिकेटच्या मैदानात बँटिग करण्यासाठी उतरला नेता, शॉट मारण्याच्या नादात गेला तोल; मजेदार Video व्हायरल

[ad_2]

Related posts