WTC 2023 Final India Australia Players Black Armbands Why Explained Odisha Triple Train Crash

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WTC Final 2023, India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर थरार रंगला आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कोण पटकावणार ? याकडे जगातील सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. ओव्हल मैदानावर नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या बाजूने पडला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओव्हल मैदानावर ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना  श्रद्धांजली अर्पण केली. एक मिनिटांचे मौन पाळत दोन्ही संघातील खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली. दोन्ही संघातील खेळाडू मैदानात दंडावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय एक हजार पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. भारतात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात होय. या दुर्देवी रेल्वे अपघातानंतर अनेक दिग्गजांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. आज भारत आणि ऑस्ठ्रेलियाच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधून रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयने याबाबत ट्वीटही केलेय. ट्वीटमध्ये म्हटलेय की, 

ओव्हल येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ओडिशा ट्रेन दुर्घटनेतील बळींच्या स्मरणार्थ एक क्षण मौन पाळणार आहे. ओडिशा रेल्वे अपघात मृत्यू झालेल्याबद्दल भारतीय संघाने शोक व्यक्त केलाय. ज्यांनी दुःखदपणे आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती तीव्र शोक व्यक्त केलाय. बाधित लोकांसोबत एकता व्यक्त करण्यासाठी टीम इंडिया हातावर काळ्या पट्टी बांधेल.

पाहा बीसीसीआयचे ट्वीट

दोन्ही संघाची प्लेईंग 11-

भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज असा संघ मैदानात उतरला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ : डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नश लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, अॅलेक्स कैरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलेंड.



[ad_2]

Related posts