IPL 2024: Mahendra Singh Dhoni’s Last Year In IPL, Will RCB Win The Title This Year? Cricket News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 : क्रिकेटसाठी 2023 प्रमाणेच 2024 हे वर्ष महत्वाचे असणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप, टी 20 वर्ल्डकप आणि महिला टी20 वर्ल्डकप 2024 या वर्षात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दरवर्षीपेक्षा यावर्षीचा आयपीएलचा हंगाम विशेष असेल. टी 20 वर्ल्डकपपूर्वी आयपीएलच्या (IPL) 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट (Cricket) रसिकांसाठी  यंदाचे वर्ष बऱ्याच अंगांनी मनोरंजन करणारे ठरेल. 

नव्या वर्षात अनेकांच्या काहीतरी वेगळे करुन दाखवण्याच्या इच्छा असतात. त्यामुळे 2024 च्या आयपीएल (IPL) हंगामात अनेक संघांना सनसनाटी विजय मिळवण्याची आशा असेल. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) काही खेळाडूंवर सर्वांची विशेष नजर असणार आहे. जाणून घेऊयात 2024 मध्ये कोणाच्या कोणत्या अपेक्षा आहेत?

आयपीएल 2024चा हंगाम महेंद्रसिंह धोनीसाठी (MS DHONI) शेवटचा आयपीएल हंगाम ठरण्याची शक्यता आहे. 42 वर्षीय एम.एस.धोनी चेन्नई सुपर किंग्जला 5 जेतेपद पटकावून दिलय. धोनी 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. दरम्यान, कॅप्टन कूल (Captain Cool) अशी ओळख असणाऱ्या धोनीने आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केलीये. गेल्यावर्षी अनेकांना वाटत होते की, हाच धोनीचा (MS DHONI)  शेवटचा आयपीएल हंगाम आहे. मात्र, धोनीही यंदाच्या वर्षीही मैदानात उतरणार आहे. 

ऋषभ पंतचे पुनरागमन? (Rishabh Pant)

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातातून सावरत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. 2022 मध्ये अपघात झाल्यानंतर त्याला पूर्णपणे ठीक व्हायला बराच वेळ लागलाय. त्यानंतर मैदानात उतरण्यासाठी त्याने मेहनत घेतलीये. ऋषभच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. पंतने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 98 सामने खेळत 2838 धावा केल्यात. 

यंदाचा किताब आरसीबी जिंकणार? (RCB IN 2024)

नवे वर्ष नव्या आशा घेऊन येते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) संघ 2008 पासून पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. यंदाच्या वर्षात तरी आरसीबीला चॅम्पियन बनता येईल का? हा मोठा प्रश्न आहे. विराट कोहली (Virat Kohli), एबी डिवीलियर्स आणि क्रिस गेलने 2016 मध्ये आरसीबीला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. मात्र, अंतिम सामन्यात आरसीबीचा हैदराबादने पराभव केला होता. दरम्यान, 2016 नंतर आरसीबीला अंतिम सामन्यात धडक मारता आलेली नाही. 

रोहितच्या उपस्थितीत हार्दिक करणार मुंबईचे नेतृत्व 

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. रोहितच्या जागी हार्दिककडे नेतृत्व दिल्याने मुंबईचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. रोहितने आजवर आयपीएलमध्ये मोठं यश मिळवलंय. रोहितप्रमाणे आयपीएलमध्ये हार्दिकला यश येणार का? हा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

गौतम गंभीरची घर वापसी 

गौतम गंभीर (Gautam Gambhir) आयपीएल 2023 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सच्या संघात प्रशिक्षक म्हणून काम करत होता. आता कोलकाता नाईट रायडर्समध्ये तो मेंटॉर म्हणून कार्यरत असणार आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 2 वेळेस चॅम्पियन बनला होता. त्यामुळे यंदाच्या गंभीरच्या प्रशिक्षणात कोलकाताचा संघ कशी कामगिरी करतो? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

David Warner : मायदेशात नाही तर विदेशात जाऊन फटकेबाजी करायचा वॉर्नर, जाणून घ्या भारताविरोधातील आकडेवारी

[ad_2]

Related posts