Dhule News Absence Of 31st December Vigil Duty Seven Policemen Suspended By Superintendent Of Police Dhule Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhule News :  पोलीस प्रशासनाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यासाठीच्या आवश्यक सूचनाही पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या. मुंबईसह (Mumbai) राज्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तात गैरहजर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात (Dhule) बंदोबस्ताच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या 7 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक ( Superintendent of Police Dhule ) श्रीकांत धिवरे यांनी त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली असून या कारवाईमुळे धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय, प्राणांकित अपघात आणि इतर अपघातांना आळा घालण्याकरिता सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर आणि मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्याशिवाय, सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदीचे देखील करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी आणि अंमलदारांना याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र, धुळे जिल्हा पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकातील काही पोलीस अंमलदार या बंदोबस्तावेळी गैरहजर असल्याची बाब समोर आली. त्यानंतर या सात पोलिसांवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 

ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 229 तळीरामांवर कारवाई

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) घराबाहेर पडलेल्या 229 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह (Drink And Drive) करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठेही गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात वाढ झाली. मागील वर्षी जवळपास 156 जणांवर कारवाई करण्यात आली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

[ad_2]

Related posts