पत्रकारांच्या घोळक्यातून अचानक विरोधी पक्षनेत्यांवर चाकूहल्ला; उडाली एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

political news : सध्या भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींमध्येच नुकताच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, पत्रकार परिषद सुरु असताना अचानकच हातात कॅमेरा आणि माईक असणाऱ्या पत्रकारांच्या घोळक्यातून एका इसमानं समोर येत विरोधी पक्षनेत्यांवर जीवघेणा चाकूहल्ला केला. 

कुठे घडली ही घटना?

विरोधी पक्षनेत्यांवरील या हल्ल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता जगभरात या व्हिडीओमुळं चिंतेची लाट पसरली. दक्षिण कोरियामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता ली जे-म्युंग यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. द. कोरियातील बुसान या शहरामध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्यावर हा हल्ला झाला. पत्रकारांच्या घोळक्याचा फायदा घेत म्युंग यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या हल्लेखोराला तातडीनं पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या म्युंग यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. योनहाप वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार रुग्णालयात नेतेवेळी ते शुद्धीतच होते. 

Related posts