Hatkanangale Lok Sabha Constituency Maharashtra Shivsena Mahayuti Dhairyasheel Mane Vs Raju Shetti Ncp Pratik Jayant Patil 2029 Vs 2024 Loksabha Election Voting Result Marathi News Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: राज्यातला शेवटच्या क्रमांकाचा म्हणजे 48 वा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये (Hatkanangale Lok Sabha Constituency) यंदा जोरदार टशन पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti)  यांचे आव्हान असणार आहे. ऐनवेळी काही राजकीय गणितं जुळली तर निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे पुत्र प्रतीक पाटीलही उतरण्याची चर्चा आहे. त्यातच आता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव (Shiv Sena Murlidhar Jadhav) यांनी निष्ठावंत शिवसैनिकाला संधी देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यातील लढत निश्चित आहे, पण शिवसेना ठाकरे गटाने जर राजू शेट्टी यांना पाठिंबा न देता मुरलीधर जाधवांना संधी दिली तर या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगल्यामध्ये येतो. त्यामुळे त्यांची ताकतही या ठिकाणी मोठी आहे. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून हातकणंगलेवर बारीक नजर असून या ठिकाणी विजयासाठी सूक्ष्म नियोजन केलं जात आहे. त्यामुळे 2024 सालच्या निवडणुकीत महायुतीचे धैर्यशील माने दुसऱ्यांदा बाजी मारणार की राजू शेट्टी कमबॅक करणार याकडे लक्ष आहे. होमग्राऊंडवर जयंत पाटील सेना-भाजपच्या रणनीतीचा टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

2019 च्या निवडणुकीत धैर्यर्शील माने यांची बाजी (Hatkanangale Lok Sabha Constituency 2019 Result)

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील या जागेवर स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर माने गट, शिवसेनेची ताकद आणि राष्ट्रवादी तसेच कारखानदारांची छुपी मदत याच्या जोरावर धैर्यशील मानेंनी 96 हजार मतांनी शेट्टींचा धुव्वा उडवला आणि हातकणंगले मतदारसंघात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला.

2019 सालचा निवडणूक निकाल –

– धैर्यशील माने (शिवसेना) – 5,85, 776 (46.78 %)
– राजू शेट्टी (स्वाभिमानी) – 4,89,737 (39.11%)

धैर्यशील माने – 96,039 मतांनी विजयी

लोकसभा मतदारसंघाची रचना कशी? (Hatkanangale Lok Sabha Constituency Detail)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांतील 6 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामध्ये शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर-वाळवा आणि शिराळा मतदारसंघ येतात. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार, काँग्रेसचा एक आमदार, जनसुराज्य पक्षाचा एक आमदार आणि भाजपला पाठिंबा दिलेला एक अपक्ष आणि शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला एक अपक्ष आमदार असं पक्षीय बलाबल आहे.

1. शाहूवाडी – विनय कोरे (जनसुराज्य- भाजपला पाठिंबा)
2. हातकणंगले – राजू आवळे (काँग्रेस)
3. इचलकरंजी – प्रकाश आवाडे (अपक्ष – भाजप समर्थन)
4. शिरोळ – राजेंद्र यड्रावकर ( अपक्ष- शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा)
5. इस्लामपूर-वाळवा – जयंत पाटील (राष्ट्रवादी)
6. शिराळा – मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)

ऊस पट्ट्यातील राजकारण 

हातकणंगले मतदारसंघ हा ऊस पट्ट्यातील प्रमुख भाग, त्यामुळे ऊसाच्या राजकारणाचा थेट परिणाम हा मतांच्या राजकारणावर होतो. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दराचा प्रश्न खऱ्या अर्थाने जर कोणी मोठा केला असेल तर तो राजू शेट्टींनी. ऊस दर आणि दूध दराच्या आंदोलनामुळे इथल्या शेतकऱ्यांना फायदा झाला, शेतकरी संघटित झाला. त्याच जोरावर राजू शेट्टी हे एकदा आमदार झाले, दोनदा खासदार झाले.

राजू शेट्टींची ‘एकला चलो रे’ची भूमिका 

पहिल्या खासदारकीवेळी भाजपसोबत आणि नंतरच्या खासदारकीवेळी काँग्रेससोबत गेल्यानंतर राजू शेट्टीच्या राजकारणाची दिशा बदलली. आंदोलनात सक्रिय असतानाही त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. त्यातून योग्य तो धडा घेतल्यानंतर आता राजू शेट्टींनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा आंदोलनात सक्रिय झाल्याचे दिसतंय. त्यातच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. धैर्यशील मानेंच्या विरोधातील नाराजीचा फायदा उचलण्याच्या तयारीत शेट्टी असून त्या दृष्टीने त्यांनी फासे टाकायला सुरूवात केली आहे.

धैर्यशील माने सक्रिय

दुसऱ्या बाजूला ऐनवेळी शिवसेनेत आलेल्या धैर्यशील मानेंना लोकांनी उचलून धरले. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची विशेष मर्जी असलेले धैर्यशील माने हे शिंदे गटात गेल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे. तसेच मधल्या काळात त्यांचा जनसंपर्कही तुटल्याची चर्चा आहे. चार वर्षांच्या काळात अनेक गावात त्यांचा संपर्क नसल्याने त्यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकांचा बदलता सूर लक्षात आल्यानंतर धैर्यशील माने पुन्हा एकदा जोमाने सक्रिय झाल्याचं दिसतंय.

मराठा कार्ड यावेळी किती फायदेशीर? (Maratha Card In Maharashtra Politics) 

गेल्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात मराठा कार्ड महत्त्वाचं ठरलं होतं. खासदार असताना राजू शेट्टी यांनी आपल्याच नात्या-गोत्यातील लोकांना महत्त्वाची पदे दिली आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे अनेक स्थानिक कार्यकर्ते राजू शेट्टीना सोडून गेले. त्याचा नेमका फायदा धैर्यशील माने यांना झाला आणि मराठा कार्डमुळे त्यांचं राजकारण यशस्वी झालं. धैर्यशील मानेंना शिवसेना भाजपसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची छुपी मदत मिळाली. कारखानदारांनीही आपली शक्ती मानेंच्या मागे लावली. त्यामुळे धैर्यशील मानेचा विजय सुखकर झाला.

जनसुराज्यची ताकत भाजपसोबत 

जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आणि शाहूवाडीचे आमदार विनय कोरे (Shahuwadi MLA Vinay Kore) यांची पन्हाळा, शाहूवाडी आणि हातकणंगले या भागात सहकारच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. त्यामुळे या लोककभा मतदारसंघात त्यांची भूमिका ही निर्णायक ठरते. पण मधल्या काळात त्यांचा कारखाना अडचणीत सापडला होता, तसेच केंद्र सरकारकडून त्यांच्या उद्योगसमूहाला मिळणारी शेकडो कोटी रुपयांची बिले थकीत होती. या दोन्ही ठिकाणी भाजपने त्यांना मदत केल्याची चर्चा आहे. परिणामी त्यांचा उद्योगसमूह आणि कारखाना अडचणीतून बाहेर पडला. त्याचीच परतफेड म्हणून गेल्या पाच वर्षांपासून ते भाजपसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभाव क्षेत्रात धैर्यशील माने यांना मोठं मतदान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाडिकांची ताकत भाजपसोबत

हातकणंगले तालुक्यात महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांची मोठी ताकद आहे. या आधी जिल्ह्यातील अनेक आमदार तेच ठरवायचे. पण नंतरच्या काळात त्यांचे तालुक्यावरील लक्ष कमी झालं. असं असलं तरीही महाडिकांची आजही लक्षणीय ताकद आहे. सध्या धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. तसेच अमल महाडिक हे पुन्हा भाजपकडून विधानसभेला उभे राहणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील महाडिक गटाची ताकद ही धैर्यशील माने यांच्या मागे राहणार असं दिसतंय.

निष्ठावंत शिवसैनिकाला संधी देण्याची मुरलीधर जाधवांची मागणी 

सुरूवातीला या मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याविरोधात महाविकास आघाडी राजू शेट्टींना पाठिंबा देणार अशी चर्चा होती. राजू शेट्टींनी 2 जानेवारी रोजी या संबंधित उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र त्यांनी अद्याप आपलं ठरलं नसल्याचं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं. या भेटीनंतर हातकणंगले मतदारसंघातील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी निष्ठावंताना संधी देण्याची मागणी केली. आपण अनेक वर्षे शिवसेनेचं काम केलं, मोर्चे काढले असं सांगत त्यांनी हातकणंगल्याच्या उमेदवारीवर दावा केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

भाजपाचा प्लॅन बी (BJP Planning For Lok Sabha Election) 

हातकणंगलेची जागा ही शिवसेनेकडे असली तरीही अद्याप जागा वाटपाची अंतिम चर्चा झालेली नाही. शिवसेनेचा शिंदे गटाचा या ठिकाणी दावा असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील एका जागेसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे हातकणंगलेची जागा जर भाजपच्या वाटेला गेलीच तर धैर्यशील मानेंना भाजपकडून निवडणूक लढवावी लागेल. गेल्या पाच वर्षांपासून भाजपने या ठिकाणी हळूहळू आपली राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडेंनी या ठिकाणी जर भाजपने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच धैर्यशील माने यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचीही सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे भाजप या ठिकाणचा उमेदवार बदलून सर्वांना धक्का देणार का हेही पाहावे लागेल.

जयंत पाटील फॅक्टर महत्वाचा 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाळवा विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगल्यात येतो. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आता त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाळवा, शिराळा आणि हातकणंगले या तीन विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. तसेच इतर तीन मतदारसंघातील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जयंत पाटील यांनी या आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे. एकाच्या मागे राजकीय ताकद तर त्याच्या विरोधकाच्या मागे आर्थिक ताकद असं काहीसं राजकारण जयंत पाटलांचं राहिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजप सेनेतही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची नेमकी भूमिका काय असेल यावर अनेक गणितं अवलंबून असतील. 

महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

राजू शेट्टी यांनी ‘एकला चालो रे’ची भूमिका घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीकडे तसा तगडा उमेदवार नाही. ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे या ठिकाणचा दावा शिवसेना सोडणार नाही. पण एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. या ठिकाणी जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटलांनी उभं राहावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जयंत पाटलांनी त्याची चाचपणी सुरू केली आहे, पण अद्याप त्यांचे राजकीय गणित आणि मतांची आकडेवारी जमत नसल्याची चर्चा आहे. कारण अपक्ष असलेले आमदार विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांच्यावर भाजपलाच मदत करण्यासाठी वरून दबाव असणार हे स्पष्ट आहे.

सुरुवातीला सेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात ही निवडणूक होणार असं चित्र होतं. पण आता ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधवांनी दावा केल्यानंतर या ठिकाणी तिरंगी लढत होणार असं दिसतंय. मुरलीधर जाधवांनी आपला पत्ता टाकलाय. तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधणारे धैर्यशील माने पुन्हा एकदा बाजी मारणार की राजू शेट्टी संसदेत कमबॅक करणार की मुरलीधर जाधवांना खासदारकीची लॉटरी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल.

 

[ad_2]

Related posts