IND Vs SA 2nd Test Mohammed Siraj And Jasprit Bumrah Cape-town 2nd Test Toss And Playing Xi Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND Vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने केपटाऊनच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण एल्गरचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी हाणून पाडला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला भारताने एकापाठोपाठ एक धक्के दिले. अवघ्या 15 धावांत आफ्रिकेची आघाडीची फळी तंबूत पाठवली. खासकरुन मोहम्मद सिराज याने भेदक मारा केला. सिराजच्या माऱ्यापुढे आफ्रिकेचे फलंदाज ढेपाळले.

नियमित कर्णधार टेम्बा बावुमच्या अनुपस्थितीत डीन एल्गर याने आज कर्णधारपदाची धुरा संभाळली. एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एल्गर आणि मार्करम फलंदाजीसाठी मैदानात आले. सिराजने चौथ्या षटकात एडन मार्करम याला तंबूचा रस्ता दाखवला. मार्करम याला फक्त दोन धावाच करता आल्या. सिराजच्या भेदक गोलंदजीसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. 

एडन मार्करम याच्यानंतर डीन एल्गर यालाही सिराजने तंबूचा रस्ता दाखवला. एल्गरनं पहिल्या कसोटी सामन्यात दीडशतकी खेळी केली होती. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पण दुसऱ्या कसोटीत एल्गरचा अडथळा सिराजने काढून टाकला. एल्गर फक्त चार धावा काढन तंबूत परतला. दुसऱ्या कसोटीत खेळणारा Tristan Stubbs ही फारकाळ टिकू शकला नाही. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर Tristan Stubbs  बाद झाला. त्याला फक्त 3 धावा करता आल्या. टोनी डे जोरजी यालाही तग धरता आला नाही. त्याला फक्त दोन धावा करता आल्या. सिराजने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. आफ्रिकेने फक्त 15 धावात चार विकेट गमावल्या. 

Kyle Verreynne आणि David Bedingham सध्या मैदानावर आहेत. आफ्रिकेकडून David Bedingham याने पहिला चौकार मारला गेला. भारताकडून सिराजने भेदक मारा केला. सिराजने दोन षटकं निर्धाव फेकली आहेत. 6 षटकात त्याने फक्त पाच धावा दिल्या. जसप्रीत बुमराह याने सहा षटकात 16 धावा दिल्यात.. एक विकेट घेतली, तर सिराजने तीन विकेट घेतल्यात.

भारताची प्लेईंग 11 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.

आफ्रिकेची प्लेईंग 11

डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्कराम, टोनी डी जोरजी, ट्रिस्टन स्टब्स, डेविड बेडिंघम, काइल वेरीने (विकेटकीपर), मार्को जेनसन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

[ad_2]

Related posts