Nashik Yashwantrao Chavan Maharashtra Open University Ayodhya Kalash Pujan Programme Controvercy Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त मुक्तविद्यापीठाच्या प्रांगणात (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) अयोध्येच्या  (Ayodhya) मंगल अक्षता कलशाचे स्वागत आणि पूजन प्रकरण प्रभारी कुलसचिवांना भोवले का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण या कार्यक्रमाचे परिपत्रक काढणाऱ्या प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची बदली करण्यात आली आहे. 

शनिवारी अभाविपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावण्याचा या परिपत्रकात उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करत हा कार्यक्रम होत असल्याचा आरोप करत या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीसह काही संघटनांनी जोरदार विरोध ईथे केला होता. जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली होती. 

दरम्यान या घटनेचा आणि पाटील यांच्या बदलीचा काहीही संबंध नसल्याचा दावा मुक्तविद्यापीठ प्रशासनाने केला आहे. या कार्यक्रमाच्या काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला होता आणि त्यानुसारच त्यांची बदली करण्यात आल्याचं सांगितले जाते आहे. 

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने देशभर विविध ठिकाणी कार्यक्रम साजरे केले जात आहेत. नाशिकच्या मुक्त विद्यापीठानेही

कलशाच्या पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. अयोध्येतून नाशिकमध्ये मंगल अक्षदा कलश आणण्यात येणार होता. त्या कलशाचं मुक्त विद्यापीठात भव्य स्वागत व्हावं अशी मागणी अभाविपाने केली होती. त्यानंतर या विनंतीस मान देऊन विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी एक परिपत्रक जारी केलं. त्यामध्ये 30 डिसेंबर रोजी सकाळी मंगल कलशाचं कुलगुरूंच्या हस्ते पूजन ठेवण्यात आलं. त्या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली होती.

विद्यापीठ प्रशासनाच्या या परिपत्रकानंतर वाद निर्माण झाला होता. विद्यापीठाच्या परिसरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा आरोप करत अनेक संघटनांनी त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यावरून विद्यापीठ प्रशासनावरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना 

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) निर्माणकार्य जोरात सुरु आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाची (Ram Temple) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी (Diwali) साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

ही बातमी वाचा :

[ad_2]

Related posts