India Bowled Out South Africa For 55 While In 2008 South Africa Bowled Out India For 76 Mohammed Siraj Takes 6 Wicket

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्या डावात अवघ्या 55 धावांत सर्वबाद झाला. आफ्रिकन संघाला सामन्यात पूर्ण सत्रही फलंदाजी करता आली नाही. एकूण 55 धावांसह आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वात कमी धावसंख्या करण्याचा लाजिरवाणा विक्रम केला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या नावावर 6 विकेट्स घेऊन किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणार्‍या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

याआधी न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम होता, जेव्हा 2021 मध्ये वानखेडेवर किवी संघ भारतीय संघाविरुद्ध 62 धावांत ऑलआऊट झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 55 धावांवर ऑलआऊट होऊन हा वाईट विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2008 मध्ये भारताचा डाव दक्षिण आफ्रिकेनं 76 धावांत गुंडाळला होता. त्याचीच आज परतफेड करत 55 धावात खेळ खल्लास केला. 

घरच्या मैदानावर लाजीरवाणा पराक्रम 

केवळ भारताविरुद्धच नव्हे तर मायदेशातील कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेसाठी अवघ्या 55 धावा ही सर्वात छोटी धावसंख्या ठरली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान आफ्रिकेचा संघ फलंदाजीत खूप मजबूत दिसत होता, पण दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर फलंदाजी कोसळली.

भारतीय गोलंदाजांचा कहर 

भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर क्रिकेटचे चेंडू नव्हे तर आगीचे गोळे फेकत होते. डावाच्या सुरुवातीपासूनच भारताने आफ्रिकेला रोखून धरले, ज्यामध्ये मोहम्मद सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली. आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने 6 षटकांतच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सिराजने प्रथम एडन मार्करम (02) आणि नंतर पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावणाऱ्या डीन एल्गर (04) यांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. सिराजने अवघ्या 15 धावांत 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी आपल्या खात्यात 2-2 विकेट घेत आफ्रिकेचा डाव 55 धावांत संपवला. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts