[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Realme 12 pro+ : Realme चे अनेक मोबाईल आतापर्यत (Smartphone) भारतात लाँच झाले आहेत मात्र आता कंपनी Realme 12 Pro सीरीज आता भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. यात Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ हे दोन फोन लाँच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या फोनमध्ये कोणते फिचर्स मिळतील आणि किंमत किती असेल ? याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
काय आहेत Realme 12 pro+ चे स्पेसिफिकेशन्स ?
रिपोर्टनुसार, Realme 12 Pro+ मध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर दिला जाईल. हा चिपसेट Redmi Note 13 Pro मध्ये देण्यात आला आहे जो भारतात 4 जानेवारीला लाँच होणार आहे. Realme 12 सिरीजमध्ये तीन सेन्सर असणारे सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल असेल. Pro+ 3x ऑप्टिकल झूमसह 64-मेगापिक्सेल OmniVision OV64B पेरिस्कोप टेलिफोटो युनिटसह येईल. दुसरीकडे, प्रो मध्ये 32 मेगापिक्सलचा Sony IMX709 टेलिफोटो मिळू शकतो. हे मॉडेल Snapdragon 7 Gen 3 SoC ने लेस असेल.
कधी होणार लाँच?
कंपनी जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रियलमी 12 प्रो सीरिज लाँच करू शकते. प्लस मॉडेलमध्ये कंपनी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 सीरिजचिपसेट देऊ शकते. कंपनी यात स्नॅपड्रॅगन 7 जेन 2 प्रोसेसर सपोर्ट करू शकते.
दोन्ही मॉडेल्समध्ये कंपनी पूर्वीप्रमाणेच circular कॅमेरा मॉड्यूल देऊ शकते. बेस मॉडेलमध्ये Sony IMX709 32MP टेलिफोटो लेन्स मिळू शकतो जो 2X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. प्लस मॉडेलमध्ये कंपनी 64 एमपी पेरिस्कोप लेन्स देऊ शकते जी 3X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल.
रियलमी फोनची किंमत किती?
या लाइनअपच्या सर्वात पॉवरफुल व्हेरियंटची किंमत चीनमध्ये 2000 युआन (जवळपास 23,500 रुपये) असू शकते, असा अंदाज आहे. वर्ष 2024 च्या पहिल्या तीन महिन्यात हा फोन चीनच्या बाजारपेठेतही उपलब्ध होणार आहे.
Realme 11x 5G 14,999 रुपयांत
Realme 11x 5G स्मार्टफोन 64MP AI ड्युअल कॅमेरा सेटअपसह मिळणार आहे. 6GB+128GB च्या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. या फोनमध्ये 8MP सेल्फी कैमरा सेंसर दिला आहे.शिवाय 6.72 इंच अल्ट्रा स्मूथ कॅमेरा सेंसर आहे. या फोनमध्ये 120HZ सपोर्ट देण्यात आला आहे. खास गोष्ट अशी की पावर बॅकअप साठी 5000mAh बॅटरी देण्यात येणार आहे.सोबतच 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट घेण्यात येईल.अजून एक वैशिष्ट्य म्हणजे MediaTek Dimensity 6199+5G चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन पर्पल डॉन, मिडनाईट ब्लॅक कलर या ऑप्शनमध्ये घेता येतो.
[ad_2]