[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी राहिला असताना राजकीय पक्षांनी आघाड्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) या आघाड्यांमध्ये सरळ लढत असणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीमधून बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ‘एबीपी माझा’च्या ‘झिरो अवर’ या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही घोषणा केली.
अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्याचे सांगत एकीकडे बच्चू कडू यांनी प्रहारला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. त्याशिवाय नवनीत राणा यांना जर उमेदवारी हवी असेल तर त्यांनी प्रहारकडून लढावं असंही कडू म्हणाले होते. त्यानंतर आता महायुतीतील प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांनी नवनीत राणा या विजयी होतील असं म्हटल्याने राणा यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ‘झिरो अवर’ या कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी महायुतीच्या नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून 51 टक्के मतांसह विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
अपक्ष की कमळाच्या चिन्हावर?
नवनीत राणा या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी राणा यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्याआधी राणा यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीकडून नवनीत राणा या विजयी होतील असे म्हटले असले तरी नवनीत राणा लढणार कोणत्या पक्षाकडून हा मोठा प्रश्न आहे. राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. तर, दुसरीकडे बच्चू कडू यांनीदेखील त्यांनी प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली असली तरी चिन्ह, पक्ष कोणता असणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
[ad_2]