Former State Minister Rajesh Tope Criticize BJP At NCP Camp In Shirdi Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajesh Tope शिर्डी : राजकारणातील (Maharashtra Politics) कुठेतरी निष्ठा व नैतिकता लोप पावत असताना आजचा हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करायचे आहे. आपल्या स्वाभिमानी बाण्याला मनापासून सलाम करायचे आहे. सह्याद्री कधी हिमालयापुढे झुकला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब असल्याचे वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात राजेश टोपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. राजकारणाच्या गढूळ वातावरणात निष्ठावान व चांगले लोक राहावेत हे मतदार बघत आहेत. निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचे महत्व वेगळे आहे, त्यामुळे आपल्याला निष्ठेची ज्योत तेवत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्ती स्थळ व आश्वासक चेहरा हे आदरणीय पवार साहेब आहेत व तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत, असे ते म्हणाले. 

पवार साहेब एक विचारधारा

राजेश टोपे पुढे म्हणाले की, शरद पवार साहेब एक व्यक्ती नाहीत तर ती एक विचारधारा आहे, त्यामुळे या विचारांना अनुसरून आपण आपल्या पक्षाला विजयाकडे घेऊन जायचे आहे. साहेबांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केले.

साहेबांना तरुण पिढीवर विश्वास

आज आपला देश सातत्याने धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करत आहे. माणसात माणूसपण ठेवत नाहीये म्हणून ‘देश गलत लोग चला रहे है’ अशी परिस्थिती आहे. या विचारधारेला विरोध करण्यासाठी पवार साहेब काम करत आहेत, त्यांना साथ देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. साहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे लढले पाहिजे. साहेबांना तरुण पिढीवर विश्वास आहे व त्यांना त्यांच्यातच आपल्या पक्षाचे भविष्य दिसत आहे. साहेबांनी आपल्या रक्तात भिनलेल्या पुरोगामी विचारांनी राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे.

जातीवाद व महागाईवर बोलणे गरजेचे

शरद पवार साहेबांच्या विचारांना पाईक असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तरुणांसाठी या सरकारने काय केले? सर्व मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत, यासाठी गावागावातील तरुणांना जागरूक करण्याचे काम केले पाहिजे. राज्यामध्ये नोकर भरती केली जात नाही, आरोग्यासारख्या महत्वाच्या विभागामध्येदेखील नोकर भरती होत नाही. जातीवाद व महागाई यांसारख्या गोष्टींवर बोलण्याची अत्यंत गरज आहे. सध्या हे लोक फार खूणशी राजकारण करत आहेत, आपल्याला संघर्ष करावे लागेल. पवार साहेबांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या सोबत असताना आपण घाबरून जाण्याचे काम नाही, आपल्याला धाडसी वृत्ती मनामध्ये ठेवावी लागेल, असेही यांनी म्हटले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी; नाशकात शिवसेना शिंदे गट आक्रमक

 

[ad_2]

Related posts