Loksabha Election 2024 Navneet Rana Amravti Loksabha Constituency Candidate Thanks To BJP Leader Chandrashekhar Bawankule For Taking Her Name In ABP Majha Zero Hour Programme Maharashtra Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एबीपी माझाच्या ‘झीरो अवर’ या कार्यक्रमात नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली. यावर नवनीत राणा यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना प्रतिक्रिया दिलीये. मी आणि रवी राणा (Ravi Rana) निवडून आल्यापासून मोदींच्या सोबत आहोत आणी मोदी आमच्यासोबत आहेत. मी बावनकुळेंचे आभार मानते. जे लोक सध्या म्हणतायत की, नवनीत राणा आमच्याकडून लढल्या पाहिजे त्याचे कारण म्हणजे आमची कामं. आता देखील देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि आम्ही मिळून अमरावतीचा विकास करु. त्यामुळे नवनीत राणा या आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय. 

नवनीच राणा यांनी यावेळी बोलताना बच्चू कडू यांना देखील उत्तर देत त्यांचे आभार मानले. बच्चू कडूंचे मी आभार मानते की त्यांनी स्विकारलं अमरावतीचा विकास फक्त नवनीत राणाच करु शकते. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 2014 मध्ये लहर होती, 2019 मध्ये त्सुनामी होती पण 2024 मध्ये डबल त्सुनामी मोदींची येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. 

बावनकुळेंकडून उमेदवार जाहीर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीमधून बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ‘एबीपी माझा’च्या ‘झिरो अवर’ या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही घोषणा केली.

बच्चू कडूंची नवनीत राणांना ऑफर

बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही ऑफर त्यांनी दिलीये. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून मी त्यांना ही ऑफर देत आहे.  

नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार?

नवनीत राणा यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे नवनीत राणा या भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार आणि नवनीत राणा त्यावर ठाम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Lok Sabha Election 2024 : Exclusive : महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

[ad_2]

Related posts