[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नाशिक: राज्यातील सर्व पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यानिमित्ताने दौरेही आखले जात आहेत. आता शिवसेना ठाकरे गटानेही आपल्या प्रचाराची तारीख ठरवल्याचं समोर आलं आहे. येत्या 23 तारखेला, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार असल्याचं खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) सांगितलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारीला जन्मदिवस आहे. त्यादिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेतील आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करतील अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे 22 जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7 वजाता गोदावरी तीरावर आरती करतील. 23 तारखेला ‘दार उघड बये दार उघड’ असा जगदंबाची आराधना करणार आहेत.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण
विनायक राऊत म्हणाले की, राम हे दैवत आहे, रामाची पूजा करताना राजकारण नको असं खासदार विनायक राऊत म्हणाले. अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आता अयोध्येतील मंदिर अर्धवट आहे, मंदिराचे पूर्ण बांधकाम झालेलं नाही, तरीही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकार्पण करत आहेत. हिंदू धर्मात पौष महिन्यांत शुभ कार्य करत नाहीत. मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण केले जात आहे.
देवेंद्र फडणवीस हे स्वार्थी, संधीसाधू आहेत, त्यांना सत्तेची लालसा आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वार्थासाठी कोणाचीही चाटूगिरी करणारे आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अयोध्येमध्ये रेल्वे स्थानक आणि विमानतळाचं ही उद्घाटन करण्यात आलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत निमंत्रित आहे, ते जाणून घ्या.
महाराष्ट्रातून एकूण निमंत्रितांची संख्या : 889
महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित व्यक्ती : 534
कोकण – 397 जण
पश्चिम महाराष्ट्र – 84 जण
मराठवाडा (देवगिरी) – 17 जण
विदर्भ – 36 जण
महाराष्ट्रातून निमंत्रित साधू संत – 355
कोकण – 74
पश्चिम महाराष्ट्र -124
मराठवाडा (देवगिरी) – 80
विदर्भ – 77
ही बातमी वाचा:
[ad_2]