Start Shivadi Nhava Sheva Bridge MTHL Or Else We Will Start It Warns Aaditya Thackeray Slams EKnath Shinde | Aaditya Thackeray: शिवडी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : शिवडी- न्हावा शेवा पूल  (Nhava Sheva Atal Setu)सुरु करा अन्यथा आम्ही सुरु करु, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray)   राज्य सरकारला दिला आहे.  निवडणुका आल्या म्हटल्यावर आता सगळीकडे यांचेच होर्डिंग आणि पोस्टर दिसतील. अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील, असा टोला  आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला आहे. दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) नक्कल करत सरकारवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, गुजरातला जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जमीन मोफत देण्यात आली आहे.  पण आमच्या मुंबई – नवी मुंबई प्रवासासाठी 250 रुपये मोजावे लागणार आहे.  उद्घाटनासाठी वेळ नाही तसेच  दिल्लीकडून तारीख मिळत नाही.  MTHL रोड जर जनतेसाठी लवकर खुला केला नाही तर मात्र आम्ही स्वतः जाऊन तो रस्ता जनतेसाठी खुला करू. तुम्हाला दिल्लीला उत्तर द्यायचे आहे पण मला या माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर  द्यायचे आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची अॅक्टिंग करत आदित्य ठाकरेंची टीका

जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवले  पण महाराष्ट्रावर या मुंबईवर दुसरा कुठला कलम बसवला आहे का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले,  जेवढा अन्याय करायचा आहे तो फक्त मुंबईवरच करणार आहात का? महाविकास आघाडीचे सरकार पाडून खोके सरकार कुठे आणलं फक्त महाराष्ट्रात आणलं. जे काही आपल्या राज्यात येणार आहे ते सर्व हळूहळू दुसऱ्या राज्यात नेत आहेत. राज्यात सरकार आहे ते महाराष्ट्रद्वेषी सरकार आहे.  एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे असं माझ्या कानावर आलं आहे.  मग सगळीकडे हेच दिसतील  सगळीकडे यांचेच होर्डिंग सगळीकडे यांचेच पोस्टर दिसतील अगदी तुमच्या आरशात सुद्धा तुम्हाला हेच दिसतील. वेदांता फॉक्सकोन कुठे गेले? बल्ब ड्रग पार्क , सबमरीन , महानंदा  सर्व गुजरातला गेले आहे.  
भाजपचे तीन मित्र पक्ष ED , CBI , IT  आहेत. तुम्ही सरकारच्या विरोधात गेलात की मग लगेच भाजपचे हे तीन मित्र पक्ष लगेच तुमच्या घरी येतात..

2024 मध्ये घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार : आदित्य ठाकरे

2024 मध्ये आपलं सरकार येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार आहे,  घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी टेंडर खातात, त्यांनी 6 हजार 80 कोटींचा घोटाळा केलाय, हे मी ठामपणे सांगतोय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.  जुन्या गोष्टीवरून आज भांडण लावत आहेत. 50 वर्षांपूर्वी ,100 वर्षांपूर्वी काय झालं यावर आता भांडण लावत आहेत. भूतकाळावर भांडण लावत आहेत. पण आम्हाला भविष्यावर बोलायचं आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणतात. आज आपल्याला कोणतं संविधान हवंय हे भाजपा सांगत आहे ते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आहे ते हे आता आपल्याला निवडायचं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

हे ही वाचा :

Mumbai Trans Harbour Link : शिवडी न्हावा शेवा अटल सेतू बांधून पूर्ण, कसा आहे नवीन मार्ग?

[ad_2]

Related posts