[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nitesh Rane and T.Raja : आमदार नितेश राणे आणि टी. राजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
सोलापूर : हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान (Hindu Jan Aakrosh Morcha) प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rana) आणि तेलंगणातील भाजप आमदार टी.राजा (T.Raja) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही नेत्यांनी भाषण्यादरम्यान धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, चितावणीखोर वक्तव्य दोन्ही नेत्यांनाच चांगलीच भोवली आहेत. या प्रकरणी सोलापुरातील (Solapur) जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी नोटीस बजावूनही केली आक्षेपार्ह वक्तव्ये पोलिसांनी नितेश राणे आणि टी राजा सिंग यांना तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये. या आशयाची नोटीस बजावली होती. तरिही टी. राजा. सिंग आणि नितेश राणेंनी प्रक्षोभक वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. सभेदरम्यान नितेश राणे आणि टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
[ad_2]