Manoj Jarange Targets Ajit Pawar For Maratha Reservation Mumbai Protest

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange on Ajit Pawar : कारवाई केल्यास अजित पवारांना मराठा  समाज उत्तर देईल, जरांगेंचा इशारा

बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईला येतांना जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पोटातलं ओठांवर आले असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. बीडच्या (Beed) दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी बोलतांना जरांगे यांनी हे वक्तव्य केले आहे. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत. यावरच कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवार बोलताना असं म्हणाले की, मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही पहिल्यापासून हेच केलं. तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले. तुम्ही मौन धरलं होतं, त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं आम्हाला वाटले होते. शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठावर आणलंच. आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून, जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत अजित पवारांना उत्तर देईल. अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाहीत असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. 

मनोज जरांगे बीडच्या दौऱ्यावर…

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांचा सहाव्या टप्प्यातला दौरा सुरू झाला असून, आज या दौऱ्याचा चौथा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील दौरा संपून मनोज जरांगे पाटील आता बीड जिल्ह्यात दाखल झाले आहे. या दरम्यान खामगावमध्ये त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आज आणि उद्या मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या  गावांमध्ये संपर्क दौरा करणार आहेत. या काळात ते मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मराठा बांधवांशी गावागावात जाऊन चर्चा करणार आहेत. तर आज आणि उद्या मनोज जरांगे पाटील हे बीडच्या गेवराई तालुक्यातच मुक्कामी असणार आहेत. 

[ad_2]

Related posts