Asia Cup 2023 Hybrid Model by PCB Rejects By Sri Lanka, Afganistan and Bangladesh Cricket Boards; आशिया कपमधून पाकिस्तानची ‘विकेट’? आता या ३ देशांनी पाकला दिला मोठा धक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठा झटका बसला आहे. खरं तर, पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये न आल्यास आशिया चषक हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डांनी हे मॉडेल नाकारले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडे आता दोनच पर्याय आहेत. पहिली म्हणजे तो स्पर्धेतून बाहेर पडेल अन्यथा आशिया चषक तटस्थ ठिकाणी पार पडेल. मात्र, यापूर्वीही आशिया चषक पाकिस्तानशिवाय पार पडला आहे.आशिया कप वनडे संयोजनातून पाकिस्तानची विकेट घेण्याची भारतीय क्रिकेट बोर्डाची मोहिम यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहेत. या स्पर्धेसाठीच्या ‘हायब्रिड मॉडेल’ला श्रीलंका, बांगलादेश तसेच अफगाणिस्तानने विरोध केला आहे. त्यामुळे या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला सोडण्याशिवाय पर्यायच राहणार नाही अशीच चिन्हे दिसत आहेत.

आशिया कपमधील तीन ते चार लढती पाकिस्तानात आणि अन्य लढती पाकिस्तानबाहेर असे ‘हायब्रीड मॉडेल’ पाक बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सुचवले होते. मात्र भारताने यास विरोध केला होता. आता भारतास श्रीलंका, बांगलादेश तसेच अफगाणिस्ताननेही पाठिंबा दिला आहे. आशिया कप स्पर्धा आता पाकिस्तानात होणार नाही. याबाबतची केवळ आता औपचारीक घोषणाच बाकी आहे. तो निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत होईल,” असे सूत्रांनी सांगितले. त्रयस्थ ठिकाणच्या स्पर्धेस मान्यता देणे किंवा माघारी हेच दोन पर्याय आता पाकिस्तानसमोर आहेत. सेठी सध्या पाक बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रवी शास्त्रींनी गियरच बदलला… WTC Final मध्ये पोहोचल्यावर रोहितबद्दल काय म्हणाले पाहा…

सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज आहे. श्रीलंका यजमानपदासाठी पुढे आल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झाले आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्धची एकदिवसीय मालिकाही रद्द केली. दुसरीकडे, जर पाकिस्तानने आशिया चषकाच्या यजमानपदावरून माघार घेतली, तर आशिया चषक स्पर्धेत ६ ऐवजी केवळ ६ संघ राहतील.

पाकने माघार घेतल्यासही स्पर्धेस आशिया कप असे संबोधण्यात येईल. मात्र यावेळी दूरचित्रवाणी हक्काचा करार नव्याने करणे भाग पडेल. भारत-पाकिस्तानमधील लढती नसल्यामुळे स्पर्धेचे मूल्य कमी होईल, असे सांगितले जात आहे. हे टाळण्यासाठी भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानसह चौरंगी स्पर्धा घेण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा भारतातही कदाचित होऊ शकेल, असेही संकेत दिले जात आहेत.

[ad_2]

Related posts