[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Karnatak Crime News: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात नाव कमावणारी कंपनीची सीईओ 39 वर्षीय सूचना सेठ (Suchana Seth) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आपल्या पोटच्या मुलाचीच हत्या करुन या निर्दयी आईनं मातृत्वाला काळीमा फासला आहे. चार वर्षांच्या मुलाची हत्या करून गोव्याहून बंगळुरूला परतत असताना कर्नाटकातील चित्रदुर्गाजवळ तिला अटक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी कारमध्ये ठेवलेल्या बॅगेतून मुलाचा मृतदेहही जप्त केला आहे. पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
हिरयुर येथील शासकीय रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर कुमार नाईक यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. पोस्टमॉर्टममध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूचना सेठनं मुलाच्या हत्येसाठी कुठल्यातरी गोष्टीचा वापर करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. उशी किंवा टॉवेलच्या मदतीनं चिमुकल्याचा गळा घोटून हत्या करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे.
चिमुकल्याची हत्या 36 तासांपूर्वीच
चिमुकल्याचा मृत्यू किती तासांपूर्वी झाला? असा प्रश्न पोलिसांनी डॉक्टरांना विचारल्यावर पोस्टमॉर्टमच्या 36 तासांपूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. तसेच, मुलाच्या शरीरावर कुठेच रक्त्याचे डाग आढळून आलेले नाहीत. मुलाचा मृत्यू गठा घोटल्यामुळे झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
वडिलांनी 7 जानेवारीला व्हिडीओ कॉलवर चिमुकल्याशी साधलेल्या संवाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ मूळची पश्चिम बंगालची. ती बंगळुरूमध्ये आली होती. तिथे तिचं एका व्यक्तीवर प्रेम जडलं आणि दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं. पण, लग्नानंतर दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. यानंतर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि रविवारी वडिलांना मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली. रविवारी 7 जानेवारी रोजी वडिलांनी आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल देखील केला होता. तो इंडोनेशियामध्ये होता आणि तिला प्रत्यक्ष भेटायला येऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 8 जानेवारीला गोव्यातील कँडोलिम भागातील सोल बनियन ग्रँड हॉटेलच्या खोलीत मुलाची हत्या करण्यात आली. पतीच्या वकिलानं दावा केला की, पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर सूचना सेठशी बोलले तेव्हा ती मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सामान्य दिसत होती.
कोण आहे सूचना सेठ?
सूचना सेठ या आर्टिफिशियल इंटेलिजेंस एथिक्स एक्स्पर्ट, डेटा सायंटिस्ट आणि माइंडफुल एआय लॅब या स्टार्टअप कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ असल्याचं सांगितलं जातं. सूचना यांच्या पतीच्या वकिलाचा दावा आहे की, तिचे स्टार्टअप अस्तित्वात नाही. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यानं एआय, डेटा अॅनालिटिक्स इत्यादी अनेक गोष्टींमध्ये हात आजमावला. त्यांचा घटस्फोट कागदावर नसल्याचा दावाही वकिलानं केला आहे. तसेच, दोघेही वेगळे राहत होते.
प्रकरण नेमकं काय?
तीन दिवसांसाठी गोव्याला कामासाठी जाण्याच्या बहाण्यानं सूचना सेठ आपल्या चार वर्षांच्या मुलासह बंगळुरूहून विमानानं आली होती. तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर तिनं मुलाचा खून केला. अटक केल्यानंतर तिनं पोलिसांना सांगितलं की, तिला हात कापून आत्महत्या करायची होती, पण नंतर तिचा विचार बदलला. यानंतर रात्री 1 वाजता ती 30 हजार रुपयांची कॅब घेऊन हॉटेलमधून बंगळुरूला निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीत रक्त आढळून आल्यानं व्यवस्थापकानं कलिंगुट पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी कॅब चालकाला बोलावून गाडी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितलं.
कर्नाटकातील चित्रदुर्ग भागातील इमंगळा पोलीस स्टेशनमध्ये चालकानं कार थांबवली आणि तेथील पोलिसांना गोवा पोलिसांशी बोलायला लावलं. गोवा पोलिसांनी महिलेच्या सामानाची झडती घेण्यास सांगितलं. यानंतर इनोव्हा कारमध्ये ठेवलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर पोलिसांनी सूचना सेठला अटक केली.
[ad_2]