वृत्तसंस्था, विल्लुपुरम (तमिळनाडू) : जिल्ह्यातील मेलपथी गावातील एका मंदिरात अनुसूचित जातीमधील भाविकांनी प्रवेश केल्यानंतर वाद उफळला आहे. यातून उच्चवर्णीय आणि मागास समाजातील सदस्यांतील संघर्ष वाढू नये, यासाठी राज्याच्या महसूल विभागाने मंदिर बुधवारी सील केले. मंदिराच्या आत जाण्यासाठी आता कोणालाही परवानगी नाही.मेलपथी गावामध्ये श्री धर्मराज द्रौपदी अम्मन मंदिर आहे. त्यात अनुसूचित जातीच्या भाविकांनी दर्शनासाठी प्रवेश केल्यानंतर वाद निर्माण झाला. स्थानिक कथित उच्चवर्णीयांनी अनुसूचित जातीच्या लोकांनी मंदिरात प्रवेश करू नये, अशी मागणी करून तसे पत्र जाहीर केले. त्यानंतर गावात सामाजिक तणाव निर्माण झाला. यावर उपाय म्हणून जिल्ह्याचे विभागीय महसूल अधिकारी एस. रवीचंद्रन यांनी मंदिराचे दार दर्शनासाठी बंद करून सील ठोकण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी, त्यांनी कथित उच्चवर्णीय व अनुसूचित जाती अशा दोन्ही गटांच्या सदस्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघत नसल्याने आणि कोणताही समुदाय माघार घेण्यास तयार नसल्याने परिसरातील शांतता व सलोखा राखण्यासाठी मंदिर सील करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Manipur Violence: संतप्त जमावाने रुग्णवाहिकेतील तिघांना पेटवले, जखमी मुलासह मातेचा मृत्यू
पोलिसांची तुकडी तैनात
मेलपथी गावातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बिघडू नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे. त्यासाठी पोलिसांची एक तुकडी गावात तैनात करण्यात आली आहे.