Ncp Sharad Pawar And Ajit Pawar May Come Together On Same Stage For Vasantdada Sugar Institute Pune Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :संतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (Vasantdada Sugar Institute)  वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडतेय. या सभेला महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित नेते आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar)  एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवारांनी पाठ फिरवली होती. काही दिवसांपूर्वी नाट्यसंमेलनात शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर येणे अजित पवारांनी टाळले होते. शरद पवारांसोबत स्टेजवर येणं अजित पवारांनी याआधी दोनदा टाळलं होतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या कार्यक्रमाकडे आहेत. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडतेय . या सभेला महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित नेते आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या सभेत साखर उद्योगासाठी धोरणं काय असावीत यावर चर्चा होणार असून वर्षभरात उत्तम कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार आणि बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. साखर उद्योगाशी संबंधित संबंधित या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत.  शरद पवार हे व्ही एस आय चे अध्यक्ष आहेत तर अजित पवार हे कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.  त्याचबरोबर अजित पवार गटात असलेले दिलीप वळसे पाटील हे व्ही एस आय चे उपाध्यक्ष आहेत.  जयंत पाटील,  शंभूराजे देसाई, विजयसिंह मोहिते पाटील,  हर्षवर्धन पाटील,  बाळासाहेब थोरात असे अनेक नेते व्ही एस आय च्या या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

अजित पवारांनी शरद पवारांसोबत स्टेजवर येणं टाळलय

मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या अर्थातच शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार सातत्यानं शरद पवारांवर त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करून टीका करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाट्य संमेलनासह अनेक कार्यक्रमांमधे अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत स्टेजवर येणं टाळलय.  मात्र आज हे दोघेही एकत्र पहायला मिळणार आहेत.  या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.  मात्र ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार का? हे अजून स्पष्ट झालेल नाही. 

हे ही वाचा :

NCP Crisis : शिंदेंच्या शिवसेनेला जो न्याय, तोच न्याय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला? शरद पवार गटाची धाकधूक वाढली

       

[ad_2]

Related posts