[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Virat Kohli and Wamika : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा टी 20 मध्ये मैदानात उतरणार आहे. या शिवाय कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) देखील अनेक महिन्यांनंतर टी 20 सामना खेळत आहे. त्यामुळे त्याच्यावरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या सामन्यात उपलबद्ध नसेल. याबाबत त्याने कौटुंबिक कारण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
विराट कोहली मालिकेतील पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. तो पहिला सामना का खेळणार नाही? याबाबतही जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबतची माहिती समोर आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) कौटुंबिक कारणांमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना खेळणार नाही, असे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
मुलगी वामिकाच्या बर्थमुळे पहिला सामना खेळणार नाही विराट
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिका हिचा आज (दि.11) बर्थडे आहे. त्यामुळेच विराट अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरणार नाही. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा 2022 च्या वर्ल्डकप पासून टी 20 सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत दोघे कशी कामगिरी करतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मोहालीच्या मैदानावर रंगणार पहिला सामना
भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान टी 20 मालिकेला आज सुरुवात होणार आहे. दरम्यान, मालिकेतील पहिला सामना मोहली येथील पंजाब क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल, असे बोलले जात आहे. या मैदानावर फलंदाजी करणे, सोपे आहे. दरम्यान, दव पडल्यामुळे गोलंदाजी करणे आणखी कठीण होऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. दरम्यान, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापत झाल्याने मालिकेत बाहेर पडले आहेत. आगामी टी 20 विश्वचषकासाठी हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यांचे पुन्हा मैदानावर येणे महत्वाचे ठरणार आहे.
संभावित भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन/जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव/रवी बिश्नोई आणि मुकेश कुमार
इतर महत्वाच्या बातम्या
Riyan Parag Century : आयपीएलपूर्वी रियान परागचा धमाका, रणजीच्या इतिहासात दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम
[ad_2]